IND vs NZ : पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियातून चौघांना डच्चू! गिल-अय्यरचं कमबॅक, 3 ऑलराऊंडरना संधी
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या वनडे सीरिजला रविवार 11 जानेवारीपासून सुरूवात होत आहे. या सीरिजआधी बडोद्यामध्ये टीम इंडियाने सरावाला सुरूवात केली आहे.
advertisement
1/8

शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांचं दुखापतीनंतर टीम इंडियात कमबॅक झालं आहे, त्यामुळे भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार आहेत. याशिवाय विराट आणि रोहितही पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहेत.
advertisement
2/8
शुभमन गिलचं टीम इंडियात कमबॅक झाल्यामुळे तो रोहित शर्मासोबत ओपनिंगला खेळेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये गिलच्या मानेला दुखापत झाली होती, त्यामुळे तो वनडे सीरिजमध्ये खेळू शकला नव्हता.
advertisement
3/8
गिल आणि रोहितनंतर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली तर चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर खेळेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे सीरिजवेळी श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली होती. या दुखपातीनंतर अय्यर टीम इंडियात कमबॅक करत आहे.
advertisement
4/8
पाचव्या क्रमांकावर वनडे टीमचा स्पेशलिस्ट विकेट कीपर म्हणून केएल राहुल खेळेल. केएल राहुलला संधी मिळाल्यामुळे ऋषभ पंतला बेंचवरच बसावं लागू शकतं. यानंतर सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकावर 3 ऑलराऊंडरना संधी मिळू शकते.
advertisement
5/8
रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि नीतीश कुमार रेड्डी हे 3 ऑलराऊंडर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये खेळतील, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यानंतर चार बॉलरमध्ये दोन फास्ट बॉलर आणि दोन स्पिनर खेळतील.
advertisement
6/8
पहिल्या वनडेमध्ये टीम इंडिया 3 ऑलराऊंडरना घेऊन खेळली तर मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांच्यावर फास्ट बॉलिंगची जबाबदारी असेल. अशा परिस्थितीमध्ये हर्षित राणाला टीमबाहेर बसावं लागू शकतं. तर कुलदीप यादव का एकमेव स्पेशलिस्ट स्पिनर टीममध्ये असेल.
advertisement
7/8
या कॉम्बिनेशनसह टीम इंडिया मैदानात उतरली तर यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा यांना प्लेइंग इलेव्हनमधून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
8/8
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियातून चौघांना डच्चू! गिल-अय्यरचं कमबॅक, 3 ऑलराऊंडरना संधी