TRENDING:

IND vs NZ ODI : रोहित शर्मा आजच मोडणार ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराटही बनणार 'आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा किंग'

Last Updated:
Rohit sharma Record Alert : पहिली वनडे मॅच सुरू झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट विराट यांपैकी कोण आपला रेकॉर्ड आधी पूर्ण करतो, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारतीय फॅन्सना या मॅचमध्ये आपल्या लाडक्या खेळाडूंकडून सिक्स आणि धावांचा मोठा धमाका अनुभवायला मिळू शकतो.
advertisement
1/7
IND vs NZ ODI : रोहित शर्मा आजच मोडणार ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड!
टीम इंडियाचा वनडे कॅप्टन शुभमन गिल याच्या नेतृत्वाखाली खेळताना या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी चांगल्या फॉर्ममध्ये राहणं संघासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये खेळाडूंचा आत्मविश्वास वाढत असून मैदानात मोठे शॉर्ट मारण्यासाठी दोघंही सज्ज आहेत.
advertisement
2/7
अशातच टीम इंडियाचा स्टार खेळाडू रोहित शर्मा याच्याकडे वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची सुवर्णसंधी आहे. ओपनर म्हणून वनडे क्रिकेटमध्ये गेलने आतापर्यंत 328 सिक्स मारले आहेत, तर रोहितच्या नावावर 327 सिक्सची नोंद आहे.
advertisement
3/7
या आगामी मॅचमध्ये रोहितने केवळ 2 सिक्स मारले, तर तो ख्रिस गेलला मागे टाकत जगातील नंबर 1 सिक्सर किंग ठरेल. रोहितच्या प्रत्येक बॉलवर प्रेक्षकांच्या नजरा खिळलेल्या असतील.
advertisement
4/7
दुसरीकडे, आधुनिक क्रिकेटचा दिग्गज विराट कोहली देखील एका महान विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. विराटच्या नावावर सध्या 27,975 आंतरराष्ट्रीय धावा आहेत. 28 हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी त्याला केवळ 25 धावांची गरज आहे.
advertisement
5/7
मात्र, न्यूझीलंडविरुद्ध विराटने 42 धावा केल्यास तो कुमार संगकाराला (28,016 धावा) मागे टाकेल, असे केल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो जगातील दुसरा बॅट्समन बनेल.
advertisement
6/7
या यादीमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 34,357 धावांसह आजही अव्वल स्थानावर विराजमान आहे. विराटने ही कामगिरी केल्यास सचिननंतर तो दुसरा भारतीय खेळाडू ठरेल ज्याने हा पल्ला गाठला आहे.
advertisement
7/7
बॉलर्सना रोखण्यासाठी रोहितचे आक्रमक धोरण आणि विराटची संयमी बॅटिंग भारताला विजयापर्यंत घेऊन जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे न्यूझीलंडला घाम फुटलाय, असं म्हटलं जर वावगं ठरणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ ODI : रोहित शर्मा आजच मोडणार ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराटही बनणार 'आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा किंग'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल