Deepa Mehta Death: कोण होत्या महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दिपा मेहता, ज्यांच्या निधनाने हळहळली संपूर्ण इंडस्ट्री? 'या' क्षेत्रात होतं मोठं नाव
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Mahesh Manjrekar First Wife Deepa Mehta Death : मराठी चित्रपटसृष्टीचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व महेश मांजरेकर यांच्या पहिली पत्नी दीपा मेहता यांचे अचानक निधन झाले. कोण होत्या त्या? जाणून घ्या.
advertisement
1/8

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांच्यावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
2/8
त्यांची पहिली पत्नी आणि मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर दीपा मेहता यांचे २५ सप्टेंबर रोजी अचानक निधन झाले. त्यांच्या जाण्याने मांजरेकर कुटुंबियांसह संपूर्ण सिनेसृष्टी हळहळ व्यक्त करत आहे.
advertisement
3/8
महेश मांजरेकर यांचे पहिले लग्न दीपा मेहता यांच्यासोबत झाले होते. दीपा मेहता यांचा अभिनयाशी थेट संबंध नसला तरी, त्या फॅशन डिझायनिंग क्षेत्रात खूप मोठं नाव होत्या. त्यांचा ‘क्वीन ऑफ हार्ट्स’ नावाचा साड्यांचा एक लोकप्रिय ब्रँड आहे.
advertisement
4/8
या ब्रँडच्या साड्यांना मराठी सिनेसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्येही मोठी मागणी आहे. त्यांची मुलगी अश्वमी मांजरेकर स्वतः या ब्रँडसाठी मॉडेलिंग करते. अश्वमी देखील आता अभिनय क्षेत्रात नशीब आजमावत आहे.
advertisement
5/8
दीपा मेहता आणि महेश मांजरेकर यांचा काही कारणांमुळे घटस्फोट झाला होता, पण त्यांची दोन्ही अपत्ये, सत्या मांजरेकर आणि अश्वमी मांजरेकर वडिलांकडे म्हणजेच महेश मांजरेकर यांच्याकडेच राहतात. मात्र, मुलांचा आईशीही खूप लळा होता, त्यामुळे ती नेहमी त्यांच्या भेटीला येत असत.
advertisement
6/8
दीपा मेहता पासून वेगळे झाल्यानंतर महेश मांजरेकर यांनी मेधा मांजरेकर यांच्याशी दुसरं लग्न केलं. मेधा मांजरेकर या त्यांच्यासोबत काम करतानाच एकमेकांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
7/8
मेधा आणि महेश यांना सई मांजरेकर ही एक मुलगी आहे. विशेष म्हणजे सईला सलमान खाननेच ‘दबंग ३’ चित्रपटातून लॉन्च केले होते आणि तिच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं.
advertisement
8/8
महेश मांजरेकर यांच्या आयुष्यातली दीपा मेहता यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. त्यांच्या अचानक जाण्याने कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Deepa Mehta Death: कोण होत्या महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दिपा मेहता, ज्यांच्या निधनाने हळहळली संपूर्ण इंडस्ट्री? 'या' क्षेत्रात होतं मोठं नाव