TRENDING:

1 तास 45 मिनिटांची जबरदस्त फिल्म, कमजोर हृदयाच्या लोकांनी चुकूनही पाहू नका, भयानक मर्डर सीन पाहून झोप उडेल

Last Updated:
OTT Best Crime Thriller: नेटफ्लिक्सवर या चित्रपटाने अक्षरशः धुमाकूळ माजवला आहे. तासनतास लोक या चित्रपटांना चिकटून बसले असून ट्रेडिंग लिस्टमध्ये हा चित्रपट टॉपवर पोहोचला आहे.
advertisement
1/9
1 तास 45 मिनिटांची जबरदस्त मर्डर फिल्म, क्षणाक्षणाला वाढतो काळजाचा ठोका
जेव्हा जेव्हा खाकी वर्दीतल्या करारी महिला पोलिसाचा विषय निघतो, तेव्हा डोळ्यासमोर एकच नाव येतं, शिवानी शिवाजी रॉय! बॉलिवूडची क्वीन रानी मुखर्जी सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निमित्त आहे तिच्या बहुप्रतीक्षित 'मर्दानी ३' चित्रपटाचं.
advertisement
2/9
या महिन्याच्या शेवटी हा चित्रपट चित्रपटगृहात धडकणार आहे, पण त्याआधीच नेटफ्लिक्सवर 'मर्दानी'च्या जुन्या भागांनी अक्षरशः धुमाकूळ माजवला आहे. तासनतास लोक या चित्रपटांना चिकटून बसले असून ट्रेडिंग लिस्टमध्ये हा चित्रपट टॉपवर पोहोचला आहे.
advertisement
3/9
नेटफ्लिक्सवर सध्या 'मर्दानी २' चा ट्रेंड जोरात आहे. केवळ १ तास ४५ मिनिटांचा हा चित्रपट तुमचा श्वास रोखून धरायला पुरेसा आहे. ७.३ IMDb रेटिंग असलेल्या या चित्रपटाची कथा राजस्थानच्या कोटा शहरात घडते. जिथे एक सायको सिरियल किलर 'सनी' (विशाल जेठवा) तरुणींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचा क्रूर छळ करतो.
advertisement
4/9
या नराधमाला पकडण्यासाठी शिवानी शिवाजी रॉय कशी आपली बुद्धी आणि ताकद पणाला लावते, हे पाहणं अत्यंत थरारक आहे. विशाल जेठवाने साकारलेला तो व्हिलन आजही अनेकांच्या स्वप्नात येऊन त्यांना घाबरवतो, इतका तो अभिनय जिवंत होता.
advertisement
5/9
येत्या ३० जानेवारीला 'मर्दानी ३' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळचा ट्रेलर पाहूनच अंगावर काटा येतोय. यावेळी शिवानी शिवाजी रॉयसमोर एखादा छोटा-मोठा गुंड नसून, 'अम्मा' नावाचं एक भयानक पात्र असणार आहे.
advertisement
6/9
मल्लिका प्रसादने साकारलेली ही 'अम्मा' शिवानीला कसं जेरीस आणते आणि मानवी तस्करीच्या या नव्या जाळ्याचा पर्दाफाश कसा होतो, हे यंदाच्या भागात पाहायला मिळणार आहे.
advertisement
7/9
लोक 'मर्दानी ३' पाहण्यापूर्वी आपला जुना संदर्भ ताजा करण्यासाठी पुन्हा एकदा 'मर्दानी १' (ह्युमन ट्रॅफिकिंगवर आधारित) आणि 'मर्दानी २' पाहण्यावर भर देत आहेत.
advertisement
8/9
रानी मुखर्जीने गेल्या काही वर्षांत 'हिचकी', 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' आणि 'मर्दानी' यांसारख्या महिलाप्रधान चित्रपटांतून स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या या चित्रपटांमधील वास्तववादी मांडणीमुळेच ओटीटीवर हे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिले जात आहेत.
advertisement
9/9
जर तुम्हाला डोक्याला ताण देणारे आणि थरार उडवणारे क्राईम थ्रिलर आवडत असतील, तर 'मर्दानी' सिरीज तुमच्यासाठी पर्वणीच आहे. विशेषतः ज्यांना 'मर्दानी ३' थिएटरमध्ये जाऊन पाहायचा आहे, त्यांनी नेटफ्लिक्सवर हे जुने भाग पाहून शिवानी शिवाजी रॉयच्या कामाची पद्धत समजून घेणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
1 तास 45 मिनिटांची जबरदस्त फिल्म, कमजोर हृदयाच्या लोकांनी चुकूनही पाहू नका, भयानक मर्डर सीन पाहून झोप उडेल
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल