BBM6 चा गेमच फिरला! सागर कारंडे नाही, तर 'हा' सदस्य ठरला नंबर वन, डेंजर झोनमध्ये कोण? पाहा Voting Trends
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
BBM6 Voting Trends: आज, १६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता व्होटिंग लाइन बंद झाली असून, समोर आलेला व्होटिंग ट्रेंड पाहून भलेभले शॉक झाले आहेत.
advertisement
1/8

मुंबई: 'बिग बॉस मराठी ६' सुरू होऊन अवघे काही दिवस झालेत, पण घरामध्ये वादाच्या ठिणगीने आता वणव्याचं रूप घेतलंय. पहिल्याच आठवड्यात नॉमिनेशनचा गाजावाजा झाला आणि आता प्रेक्षकांच्या निकालाची वेळ आली आहे.
advertisement
2/8
आज, १६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता व्होटिंग लाइन बंद झाली असून, समोर आलेला व्होटिंग ट्रेंड पाहून भलेभले शॉक झाले आहेत. ज्यांना घराबाहेर काढण्यासाठी स्पर्धकांनी पूर्ण ताकद लावली, त्यांनाच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्याचं चित्र दिसतंय.
advertisement
3/8
घरात शिरल्यापासून ज्या दोन नावांनी सर्वाधिक गोंधळ घातला, त्या म्हणजे राधा पाटील आणि दीपाली सय्यद. राधाच्या डान्सवरून दीपालीने केलेली टीका असो किंवा तन्वीने सागर कारंडेशी केलेली बाचाबाची, या वादांचा फटका व्होटिंगवर झाल्याचं दिसतंय.
advertisement
4/8
राधा पाटील सध्या पाचव्या क्रमांकावर आहे, तर दीपाली सय्यदलाही अपेक्षेप्रमाणे मतं मिळालेली नाहीत. 'बिग बॉस'च्या चाहत्यांनी केवळ भांडखोर वृत्तीला नव्हे, तर खेळाला महत्त्व दिल्याचं या ट्रेंडमध्ये दिसतंय.
advertisement
5/8
सर्वात मोठी धक्कादायक बातमी म्हणजे सोशल मीडिया स्टार 'छोटा डॉन' अर्थात प्रभू शेळके थेट शेवटच्या क्रमांकावर फेकला गेला आहे. प्रभूच्या रिल्सवरून आधीच प्रेक्षकांमध्ये तीव्र संताप होता. त्याच्या अश्लील आशयामुळे त्याला बिग बॉसच्या घरात घेण्यावरून कलर्स मराठीवर सडकून टीका झाली होती.
advertisement
6/8
आता तोच राग प्रेक्षकांनी मतदानाद्वारे काढलेला दिसतोय. प्रभू शेळके आणि रुचिता जामदार हे दोघेही डेंजर झोनमध्ये असून प्रभूचं घराबाहेर जाणं जवळपास निश्चित मानलं जातंय.
advertisement
7/8
सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेनुसार आणि ताज्या रिपोर्ट्सनुसार, या आठवड्याच्या व्होटिंग ट्रेंडमध्ये रोशन भजनकर सर्वांना मागे टाकत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. रोशनच्या शांत पण प्रभावी खेळाने प्रेक्षकांचे मन जिंकलेलं दिसतंय. त्याच्या पाठोपाठ दिव्या शिंदे दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर धिंगाणा घालणारा करण सोनावणे तिसऱ्या स्थानी आहे.
advertisement
8/8
तन्वी कोलते हिने ज्येष्ठ कलाकार सागर कारंडेला अपात्र ठरवून जो अपमान केला, त्याचे पडसाद सोशल मीडियावर उमटले. सागर कारंडेला महाराष्ट्राने भरभरून मतं देऊन चौथ्या क्रमांकाच्या आसपास सुरक्षित ठेवलं आहे. तन्वीच्या वागण्यामुळे तिलाही प्रेक्षकांच्या रोषाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
BBM6 चा गेमच फिरला! सागर कारंडे नाही, तर 'हा' सदस्य ठरला नंबर वन, डेंजर झोनमध्ये कोण? पाहा Voting Trends