हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. थंड हवा आणि उष्णतेमुळे ओलावा म्हणजेच आर्द्रता कमी होते. हिवाळ्यात त्वचा कोरडी, निस्तेज होते आणि अंगाला खाज सुटू शकते, यासाठी त्वचेला योग्य प्रमाणात मॉइश्चरायझ ठेवणं आवश्यक आहे.
हिवाळ्यातील त्वचेचा खरा सुपरहिरो आपल्या स्वयंपाकघरातच आहे. शुद्ध देशी गायीचं तूप. आयुर्वेदातही याचं महत्त्व सांगण्यात आलंय. तुपामुळे शरीराला आतून पोषण मिळतं. थंड, कोरड्या हवेमुळे त्वचेतला नैसर्गिक ओलावा कमी होतो, तेव्हा तूप त्वचेला शांत करण्यासाठी, नैसर्गिक चमक कायम ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे.
advertisement
Bitter Gourd : कारलं का महत्त्वाचं ? पाहूया शरीरासाठी कारल्याचे औषधी उपयोग
हेल्थलाइनच्या मते, कोरड्या, भेगा आणि संवेदनशील त्वचेसाठी पारंपरिकपणे तुपाचा वापर सुरक्षित मानला जातो, हिवाळ्यात ओठ कोरडे होतात यासाठी तूप वापरता येईल. खरंतर, तूप हा नैसर्गिक लिप बाम आहे.
2025 च्या एका अहवालात याविषयी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. तूप तेलकट असतं, त्यामुळे मुरुम प्रवण त्वचेवर छिद्रं बंद होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे तूप भरपूर न लावता पुरेसं वापरावं.
हिवाळ्यात थंड हवा, कमी आर्द्रता, गरम आंघोळ आणि रूम हीटरमुळे त्वचा कोरडी होते, ज्यामुळे त्वचा सोलली जाते, निस्तेज दिसते आणि कधीकधी त्वचेवर सूजज येते.
Heart Health : हृदयाच्या आरोग्याला प्राधान्य द्या, हृदयाच्या मजबुतीसाठी टिप्स
बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक मॉइश्चरायझर्समुळे त्वचेचा पृष्ठभाग मऊ होतो. पण तुपामुळे त्वचेचे थर मजबूत होतात. तुपात आढळणारी अ, ड, ई आणि के जीवनसत्त्वं, तसंच नैसर्गिक फॅटी एसिडमुळे त्वचेचं खोलवर पोषण होतं. म्हणूनच तुपाचा वापर पिढ्यानपिढ्या केला जातोय. भेगाळलेल्या टाचा, ओठ फाटणं, बाळांच्या मालिशसाठीही याचा वापर होत आलाय. तसंच, आजारानंतर त्वचा बरी होण्यासाठीही तुपाचा वापर केला जातो.
