पडद्यामागचा आवाज आता पडद्यासमोर! अनेक वर्षांनी TV वर परत येतीये ती अभिनेत्री
- Published by:Minal Gurav
Last Updated:
मराठी टेलिव्हिजनवर नवी मालिका सुरू होतेय. या मालिकेतून पडद्यामागची एक अभिनेत्री अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर दिसणार आहे.
advertisement
1/8

असे अनेक कलाकार आहेत जे पडद्यामागे काम करत असतात. पडद्यामागे काम करूनही त्यांची एक वेगळी ओळख त्यांनी बनवलेली असते. त्यांना स्क्रिनवर पाहण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.
advertisement
2/8
अशीच एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री जी गेली अनेक वर्ष छोट्या पडद्यावर पण पडद्यामागे काम करतेय. तिच्या आवाजानं तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रत्येक मालिकेच्या मागे तिचा आवाज प्रेक्षकांना ऐकू येत होता. आता तोच आवाज आणि ती अभिनेत्री प्रत्यक्ष प्रेक्षकांना भेटायला येणार आहे.
advertisement
3/8
स्टार प्रवाह असो किंवा झी मराठी... प्रत्येक मालिकेच्या प्रोमोमध्ये या अभिनेत्रीचा खणखणीत आवाज प्रेक्षक गेली अनेक वर्ष ऐकत आले आहेत.
advertisement
4/8
फक्त मालिकाच नाही तर अनेक कार्टून आणि सीरिजमध्येही या अभिनेत्रीचा आवाज ऐकू येतो. आपण बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे मेघना ऐरंडे. डोरेमॉनला या कार्टूनला आवाज देणारी मेघना ऐरंडे गेली अनेक वर्ष वॉइज ओवरच्या क्षेत्रात आपलं नाव कमावतेय.
advertisement
5/8
अनेक वर्षांनी मेघना ऐरंडे मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मेघना ऐरंडेची नवी मालिका लवकरच झी मराठी वाहिनीवर सुरू होते. या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत आहे. मेघनाला छोट्या पडद्यावर पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.
advertisement
6/8
सनई चौघडे असं मेघनाच्या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत तिनं एका आईची भूमिका केली आहे. चार मुलींची आई तिच्या लेकींच्या लग्नासाठी उत्तम जावयाच्या शोधात आहे. जावयांसाठी तिची स्वप्न देखील खूप मोठी आहेत.
advertisement
7/8
मेघनाबरोबरच अभिनेत्री चिन्मयी साळवी मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर अभिनेता राज हंचनळे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
advertisement
8/8
अभिनेत्री मेघना ऐरंडेनं आतापर्यंत डिझनी टीव्हीच्या अनेक कार्टून्सना आवाज दिला आहे. निंजा हतोडी, डोरेमॉन, बॉब द बिल्डर, पोकेमॉन, परमॅन, लिटिल क्रिश्ना, बार्बी सारखे कॅरेक्टर खूप गाजले. मेघनाला आतापर्यंत वॉइज ओवर क्षेत्रात अनेक नामांकित पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. मालिका विश्वातही गेली अनेक वर्ष ती प्रोमोसाठी आवाज देतेय. मेघनाला अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पडद्यामागचा आवाज आता पडद्यासमोर! अनेक वर्षांनी TV वर परत येतीये ती अभिनेत्री