TRENDING:

रिलसाठी नवरी बनली, खऱ्या आयुष्यात कधी लग्न करणार गौतमी पाटील? जोडीदाराबाबतही सांगितलं

Last Updated:
Gautami Patil Wedding : गौतमी पाटीलचा लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सगळ्यांना धक्का बसला. पण हे रिलसाठी असल्याचं तिने सांगितलं. मग प्रत्यक्षात लग्न कधी करणार, याबाबतही काही दिवसांपूर्वीच तिने सांगितलं होतं.
advertisement
1/5
रिलसाठी नवरी बनली, खऱ्या आयुष्यात कधी लग्न करणार गौतमी? जोडीदाराबाबतही सांगितलं
गौतमी पाटीलचा लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सगळ्यांना धक्का बसला. नवरी बनललेली गौतमी पाटील आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहोचलेला ओंकार राऊत नवरा. गृहप्रवेशाचा हा व्हिडीओ ज्यात गौतमी ओंकारसाठी उखाणा घेताना दिसली.
advertisement
2/5
हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर गौतमी पाटीलने ओंकार राऊतसोबत लग्न केल्याची चर्चा होऊ लागली. पण गौतमीने हा व्हिडीओ म्हणजे तिच्या एका आगामी प्रोजेक्टचं शूटिंग असल्याचं कमेंटमध्ये सांगितलं. म्हणजे गौतमी पाटील रिलसाठी नवरी बनली. पण मग ती खऱ्या आयुष्यात लग्न कधी करणार हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे.
advertisement
3/5
वॅलेंटाइन डेच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत गौतमी पाटीलने तिच्या लग्नाबाबत आणि भावी जोडीदाराबाबत व्यक्त झाली होती.. ती कधी लग्न करणार, तिला जोडीदार कसा हवा याबाबत तिने सांगितलं होतं.
advertisement
4/5
गौतमीने सांगितलं की, "इन्स्टाग्रामवर मला खूप मेसेज असतात. आय लव्ह यू गौतमी, आय लाइक यू, हे प्रेक्षकांचं प्रेम आहे. कार्यक्रम सुरू असतानाच मला मागणीही आल्यात. पण मला इतक्या लवकर लग्न करायचं नाही. कारण आता करिअरची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता मला यात पडायचं आहे. करिअरच्या बऱ्याच गोष्टी करून पुढे गेल्यावर मी लग्नाचा विचार करेन"
advertisement
5/5
कसा जोडीदार हवा असं विचारलं असता, गौतमीने सांगितलं की,  "ती व्यक्ती समजून घेणारी असावी, बऱ्याच गोष्टी माझ्यासोबत घडल्या आहेत, त्या स्वीकारणारी असावी"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रिलसाठी नवरी बनली, खऱ्या आयुष्यात कधी लग्न करणार गौतमी पाटील? जोडीदाराबाबतही सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल