TRENDING:

Sunset Clause : जेन झींच्या डेटिंगमध्ये नव्या टर्मची एंट्री, काय आहे सनसेट क्लॉज? उत्तर वाचून थक्क व्हाल!

Last Updated:
What Is Sunset Clause : जेन झी ही अशी जनरेशन आहे, जी सध्या प्रत्येकच बाबतीत खूप चर्चेत असते. त्यांचे नात्यांविषयीचे विचार असो, जॉबविषयीचे किंवा जबाबदाऱ्यांविषयीचे.. हे सगळे खूपच वेगळे आहेत. आज आम्ही तुम्हाला जेन झींची एक नवीन टर्म सांगत आहोत, जी आहे सनसेट क्लॉज. चला पाहूया याबाबदल सविस्तर माहिती.
advertisement
1/7
जेन झींच्या डेटिंगमध्ये नव्या टर्मची एंट्री, काय आहे सनसेट क्लॉज?
नात्याबाबतीत जेन झी खूपच सजग असल्याचे दिसतात. कोणाला किती महत्त्व द्यायचे, कोणासोबत कितीवेळ राहायचे, नेमके कोणासोबत रायाचे, आपल्याला जोडीदार कसा हवा आहे. याबद्दल ही लोकं खूप स्पष्ट असतात. त्यामुळे ते त्यांच्या नात्याला पारखण्यासाठी वेगवेगळे ट्रेंड बनवतात आणि ते फॉलो करतात.
advertisement
2/7
नुकताच जेन झींचा 'सनसेट क्लॉज' हा नवा ट्रेंड समोर आला आहे. एखाद्या व्यक्तीसोबत किती वेळ घालवायचा आणि ते नातं कधी संपवायचं याबद्दल सांगणारा हा ट्रेन आहे. जसे व्यवसायात करार केले जातात, तसेच डेटिंगमध्येही जेन झी आता ही पद्धत वापरत आहेत.
advertisement
3/7
जसे आपण बोललो जेन झींना त्यांचा जोडीदार कसा हवाय आणि कोणासोबत किती वेळ राहायचं हे स्पष्ट असतं. त्याचप्रमाणे या ट्रेंडमध्ये दोन लोक एकत्र येऊन एकमेकांना समजून घेतात. या ट्रेंडमध्ये ठरलेले असतं की, जर एकमेकांसोबत आपले विचार पटले नाहीत तर एका विशिष्ठ वेळेनंतर सन्मानाने वेगळं व्हायचं.
advertisement
4/7
हा ट्रेंड फॉलो करण्याचा सर्व मोठा फायदा म्हणजे वेळेची बचत. जर एखाद्या व्यक्तीसोबत आपले विचार किंवा इतर गोष्टी जुळत नातील तर त्या नात्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा ते संपवून भविष्याचा विचार करता येतो आणि वेळही वाया जात नाही.
advertisement
5/7
नात्याकडून आपल्याला काय हवं आहे आणि ते न मिळाल्यास आपण वेगळं व्हायचं हे यामध्ये आधीच ठरलेलं असतं. त्यामुळे जे जोडीदारासोबत सूट जुळलं नाही तर पुढे भावनिक त्रास आणि बर्नआउट जास्त होत नाही. कारण मनाची तयारी आधीच झालेली असते.
advertisement
6/7
या सनसेट क्लॉजमध्ये आपल्याला स्पष्टपणे हो किंवा नाही ठरवता येते आणि समोरच्या व्यक्तींचाही दबाव राहात नाही. शिवाय, ठरवून व्यवस्थित बोलून वेगळं झाल्यामुळे परस्पर आदर टिकतो.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Sunset Clause : जेन झींच्या डेटिंगमध्ये नव्या टर्मची एंट्री, काय आहे सनसेट क्लॉज? उत्तर वाचून थक्क व्हाल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल