Chikoo Barfi Recipe : चिक्कूपासून बनवा अतिशय सोपी बर्फी; चवीला होईल इतकी भन्नाट, प्रत्येकजण विचारेल रेसिपी!
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Chikoo Barfi Recipe In Marathi : आपल्या शरीरासाठी हंगामी फळं खाणं खूप गरजेचं असतं. आपण बऱ्यापैकी फळं खातोही. पण मुलं सगळीच फळं खात नाही. असाच एक हंगामी फळ आहे, ते म्हणजे चिक्कू. चिक्कू खायला काही लोकांना आवडत नाही पण तुम्हाला माहितीये तुम्ही चिक्कूपासून एक मानणार रेसिपी बनवू शकता. जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील.
advertisement
1/5

चिक्कूमध्ये नैसर्गिक साखर, फायबर आणि आवश्यक खनिजे असतात. हे शरीराला त्वरित ऊर्जा देण्यास मदत करतात. त्यात व्हिटॅमिन बी, सी आणि ई तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज आणि भरपूर फायबर असते. म्हणूनच चिक्कू खाल्ल्याने पचन सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
advertisement
2/5
लोक चिकू असेच खातात किंवा शेकमध्ये टाकून पितात. परंतु त्यापासून बनवलेल्या बर्फीची चव खूप खास असते. घरी बनवण्यास सोपी ही गोड बर्फी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. चिक्कू बर्फी बनवण्यासाठी आधी ताजे, चांगले पिकलेले चिकू घ्या. ते स्वच्छ पाण्याने धुवा आणि सोलून घ्या.
advertisement
3/5
आता, चिक्कूचा गर किंवा पल्प मॅश करा. चिक्कूची साल काढू नका. ती तशीच मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट बनवा. यामुळे बर्फीची चव आणि पोषण दोन्ही वाढते. आता एक पॅन घ्या आणि मंद आचेवर ठेवा. मॅश केलेले चिकू आणि सालीची पेस्ट घाला. मिश्रण सतत ढवळत राहा. हळूहळू त्याचा कच्चेपणा कमी होईल. यासाठी थोडे शिजवा.
advertisement
4/5
यानंतर यामध्ये खवा घाला आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे शिजवा. मिश्रण घट्ट झाल्यावर आणि पॅनला सोडू लागल्यावर गॅस बंद करा. आता यामध्ये नारळ पावडर, वेलची पूड आणि चिरलेले पिस्ता घालून चांगले मिसळा. यामुळे बर्फीचा सुगंध आणि चव दोन्ही वाढेल.
advertisement
5/5
त्यानंतर एक ट्रे किंवा प्लेट घ्या आणि त्यावर तूप लावा. तयार केलेले मिश्रण त्यात घाला आणि ते समान रीतीने पसरवा. ते 3 ते 4 तासांसाठी सेट होऊ द्या. बर्फी पूर्णपणे सेट झाल्यावर ती इच्छित आकारात कापा. चिक्कूपासून बनवलेली ही बर्फी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल आणि सण किंवा खास प्रसंगी बनवली जाऊ शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Chikoo Barfi Recipe : चिक्कूपासून बनवा अतिशय सोपी बर्फी; चवीला होईल इतकी भन्नाट, प्रत्येकजण विचारेल रेसिपी!