TRENDING:

Nana Patekar : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकड्यांचा भारतीयांवर गोळीबार, नाना पाटेकर ठरले 117 कुटुंबाचा आधार

Last Updated:
Nana Patekar : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे असं नेहमीच सगळे म्हणतात. याचा पुन्हा एकदा अनुभव आला आहे. जे बॉलिवूडलाही जमलं नाही ते नानांनी करून दाखवलं.
advertisement
1/7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकड्यांचा भारतीयांवर गोळीबार, नाना ठरले 117 कुटुंबाचा आधार
ज्येष्ठ मराठी अभिनेते नाना पाटेकर अभिनय क्षेत्रासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही सक्रीय असतात. सामाजिक क्षेत्रात त्यांचं विशेष योगदान आहे.
advertisement
2/7
नानांचं कौतुक करावं तितकं कमी आहे याचा आणखी एक प्रत्यय समोर आला आहे. नानांनी आपल्या समाज सेवेत अमूल्य योगदान दिलं आहे.
advertisement
3/7
अभिनेते नाना पाटेकर यांनी निर्मला गजानन फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत भारतीय सैन्याच्या सहकार्याने सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात बाधित झालेल्या राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील 117 कुटुंबांना मदत केली.
advertisement
4/7
निर्मला गजानन फाउंडेशन अंतर्गत नानांनी घटनास्थळाला भेट दिली. नाना पाटेकर म्हणाले की, "7 ते 10 मे दरम्यान पाकिस्तानी गोळीबारात जीव गमावलेल्या आणि घरांचे नुकसान झालेल्या 117 कुटुंबांना एकूण 42 लाख रुपये देण्यात आले आहेत."
advertisement
5/7
पाटेकर म्हणाले की, "त्यांनी पूंछ येथे पाकिस्तानी हल्ल्यात ज्या 11 वर्षांच्या मुलीचे वडील अमरिक सिंग मारले गेले होते तिला शिक्षण देण्याची जबाबदारी घेतली आहे."
advertisement
6/7
"सीमेवर राहणारे लोक एकटे नाहीत हे दाखविण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. आपण केवळ सरकारवर अवलंबून राहू नये. प्रत्येकाने पुढे येऊन किमान एक कुटुंब दत्तक घेतले पाहिजे", असंही ते म्हणाले.
advertisement
7/7
नाना पाटेकर म्हणाले की, "त्यांच्या फाउंडेशनने शिक्षण आणि पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि काश्मीरमधील एकूण 48 आर्मी गुडविल स्कूल दत्तक घेतले आहेत."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Nana Patekar : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकड्यांचा भारतीयांवर गोळीबार, नाना पाटेकर ठरले 117 कुटुंबाचा आधार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल