TRENDING:

ना मोदक, ना पुरणपोळी, आमिर खानला खायचा आहे 'हा' मराठमोळा पदार्थ; थेट लेकीच्या सासूबाईंकडे केली फर्माइश

Last Updated:
Ira Khan Mother-in-law Pritam Shikhare: नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नुपूर शिखरे याच्या आई प्रीतम शिखरे यांनी आमिर खानच्या साधेपणाचा अनुभव सांगितला.
advertisement
1/6
आमिर खानला खायचा आहे 'हा' मराठमोळा पदार्थ; थेट लेकीच्या सासूबाईंकडे केली फर्माइश
मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत असले तरी, तो आपल्या मुलांसोबतचे नाते नेहमी जपतो. दोन वर्षांपूर्वी त्याची मुलगी आयरा खान हिने मराठमोळा फिटनेस ट्रेनर नूपूर शिखरे याच्याशी थाटामाटात लग्न केले.
advertisement
2/6
आता आयराची सासू आणि नूपूरची आई, प्रीतम शिखरे यांनी आमिर खानबद्दल एक गोड आणि घरगुती किस्सा एका मुलाखतीत सांगितला आहे, ज्यामुळे दोन्ही कुटुंबांमधील जिव्हाळ्याचे संबंध समोर आले आहेत.
advertisement
3/6
प्रीतम शिखरे आणि नूपूर शिखरे सोशल मीडियावर त्यांच्या भन्नाट रिल्समुळे नेहमीच ट्रेंडमध्ये असतात. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रीतम शिखरे यांनी आमिर खानच्या साधेपणाचा अनुभव सांगितला.
advertisement
4/6
प्रीतम शिखरे म्हणाल्या की, त्यांना आमिर खानने स्वतः त्यांच्या हातचं 'वरण भात' खाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्रीतम शिखरे यांनी सांगितले, "त्यांनी मला सांगितलं की, 'मला तुमच्या हातचं वरण भात खायला आवडेल'."
advertisement
5/6
त्या पुढे म्हणाल्या की, काही ना काही कामांमुळे तो योग अजून जुळून येत नाहीये, पण लवकरच तो येईल अशी आशा आहे. प्रीतम शिखरे यांच्या हातचे जेवण केवळ आमिर खानलाच नाही, तर त्यांची सून आयरा खानलाही खूप आवडते.
advertisement
6/6
प्रीतम शिखरे म्हणाल्या, "माझ्या जेवणाचे कौतुक माझा मुलगा आणि सूनबाई नेहमी करत असतात. एकदा नुपूरच्या वाढदिवसाला मी उकडीचे मोदक केले होते. आयराला माझ्या हातचे मोदक खूप आवडतात. तिने घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याला आवर्जून सांगितले की, 'तुम्ही हे खाऊन बघा, खूप अप्रतिम झाले आहेत!'"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ना मोदक, ना पुरणपोळी, आमिर खानला खायचा आहे 'हा' मराठमोळा पदार्थ; थेट लेकीच्या सासूबाईंकडे केली फर्माइश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल