TRENDING:

Dharmendra Property: सनी-बॉबी ना ईशा-आहाना, धर्मेंद्र यांनी वडिलोपार्जित जमीन केली 'या' खास व्यक्तींच्या नावावर

Last Updated:
Dharmendra Property: धर्मेंद्र यांचे मूळ गाव लुधियाना जिल्ह्यातील डांगो हे होते. धर्मेंद्र यांचे बालपणीचे पहिले तीन वर्षे डांगो गावातच गेले. ज्या घरात त्यांनी आपले बालपण घालवले, त्या घराची आजची किंमत कोट्यवधींमध्ये आहे.
advertisement
1/8
सनी-बॉबी ना ईशा-आहाना, धर्मेंद्र यांनी त्यांची जमीन केली खास व्यक्तीच्या नावावर
मुंबई: बॉलिवूडचे 'ही-मॅन' आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या चित्रपटांइतकीच त्यांच्या खासगी आयुष्याची आणि कुटुंबाची चर्चा झाली.
advertisement
2/8
दोन पत्नी आणि दोन कुटुंबांबरोबरच त्यांच्या संपत्तीचे आकडेही चर्चेत आले. पण कमी लोकांना धर्मेंद्र यांच्या भूतकाळाबद्दल आणि त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल माहीत असेल.
advertisement
3/8
धर्मेंद्र यांचा जन्म पंजाबमधील नसराली येथे झाला असला तरी, त्यांचे मूळ गाव लुधियाना जिल्ह्यातील डांगो हे होते. या गावाला त्यांनी शेवटपर्यंत जपले. धर्मेंद्र यांचे बालपणीचे पहिले तीन वर्षे डांगो गावातच गेले. ज्या घरात त्यांनी आपले बालपण घालवले, त्या घराची आजची किंमत कोट्यवधींमध्ये आहे.
advertisement
4/8
धर्मेंद्र यांनी चित्रपटसृष्टीत मोठे यश मिळवल्यानंतर या घराची जबाबदारी आपल्या चुलत भावाच्या मुलांवर सोपवली. धर्मेंद्र यांच्या वडिलांनी त्यांना या घराची काळजी घेण्यास सांगितले होते, पण जेव्हा ते कामात व्यग्र झाले, तेव्हा त्यांनी ही जमीन आपल्या पुतण्यांना सोपवून दिली. जेणेकरून ते कुटुंबासोबत या घरात आनंदात राहू शकतील.
advertisement
5/8
धर्मेंद्र यांच्या या दिलदारपणाबद्दल त्यांच्या पुतण्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांचे पुतणे बुटा सिंह यांनी सांगितले की, अभिनेत्याने त्यांना २.५० एकरमध्ये पसरलेली वडिलोपार्जित जमीन सोपवली आहे.
advertisement
6/8
आजच्या काळात लोक थोड्याशा जमिनीसाठी भांडतात, पण धर्मेंद्र यांनी आपल्या पुतण्यांना तब्बल ५ कोटी रुपये किमतीची ही जमीन कायदेशीररित्या त्यांच्या नावावर करून दिली. आजही त्यांचे पुतणे लुधियानाच्या टेक्सटाईल मिलमध्ये काम करतात आणि ते धर्मेंद्र यांचा खूप आदर करतात.
advertisement
7/8
धर्मेंद्र यांनी ही जमीन केवळ तोंडी नव्हे, तर कायदेशीररित्या हस्तांतरित केली होती. २०१३ मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी धर्मेंद्र डांगो गावात गेले होते. घरी पोहोचताच ते भावूक झाले आणि त्यांनी येथील माती आपल्या कपाळाला लावली.
advertisement
8/8
यानंतर दोन वर्षांनी, म्हणजे २०१५ मध्ये, त्यांनी पुन्हा डांगो गावाला भेट दिली आणि ही वडिलोपार्जित जमीन कायदेशीररित्या आपल्या पुतण्यांच्या नावावर केली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dharmendra Property: सनी-बॉबी ना ईशा-आहाना, धर्मेंद्र यांनी वडिलोपार्जित जमीन केली 'या' खास व्यक्तींच्या नावावर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल