TRENDING:

Girija Oak: ना आई, ना मम्मी, ना मॉम; गिरिजा ओकने आईसाठी ठेवलंय क्यूट नाव, सांगितला नावामागचा हटके किस्सा

Last Updated:
Girija Oak Mother Name: गिरीजा आपल्या आईला लाडाने काय हाक मारते, हे ऐकून प्रेक्षकांनाही हसू आलं. 
advertisement
1/7
ना आई, ना मम्मी,ना मॉम; गिरिजा ओकने आईसाठी ठेवलंय क्यूट नाव,सांगितला हटके किस्सा
मुंबई: काही महिन्यांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक अख्ख्या भारताची 'नॅशनल क्रश' बनली. पण पडद्यावर अतिशय ग्लॅमरस वाटणारी गिरीजा खऱ्या आयुष्यात आपल्या आईच्या खूप जवळ आहे. नुकत्याच एका टॉक शोमध्ये गिरीजा तिच्या आईसोबत दिसली आणि या माय-लेकींच्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
advertisement
2/7
अभिनेत्रींचं आयुष्य कितीही ग्लॅमरस असलं तरी, घरी परतल्यावर ते एखाद्या सामान्य मुलीसारखेच आपल्या आईच्या कुशीत विसावतात, हेच गिरीजाच्या या गप्पांवरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय.
advertisement
3/7
‘दिल के करीब’ या कार्यक्रमात गिरीजाने आपली आई पद्मश्री पाठक यांच्यासोबत हजेरी लावली होती. यावेळी आई-लेकीच्या नात्यातील अनेक गोष्टी उलगडल्या गेल्या. गिरीजा म्हणाली की, कामाच्या गडबडीत कधीकधी आईशी दोन-तीन दिवस बोलणं होत नाही. पण एकदा का तिसरा दिवस उजाडला की मनाला रुखरुख लागायला लागते.
advertisement
4/7
गिरीजा सांगते, "दोन-तीन दिवस गॅप पडला की आईचा फोन येतोच. मग मी आजूबाजूच्या लोकांना सांगते, आता मला २० मिनिटं द्या, कारण आता गप्पांचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. आईने पहिल्यांदा मारलेल्या हाकेवरूनच मला कळतं की तिची मनस्थिती काय आहे. तिने जर लांबून 'गिरीजाऽऽऽ' अशी हाक मारली की समजायचं पुढचे २० मिनिटं आपल्याला फक्त ऐकून घ्यायचं आहे!"
advertisement
5/7
कधीकधी गिरीजा बिझी असते आणि आईचाही फोन येत नाही, तेव्हा तिला एक वेगळीच धास्ती वाटते. "आईचा फोन का नाही आला? ती माझ्यावर रुसली तर नाही ना?" असा विचार मनात येतो आणि मग गिरीजा स्वतःहून तिला फोन लावते.
advertisement
6/7
गिरीजाच्या आईनेही यावेळी लेकीचं कौतुक केलं. त्या म्हणाल्या, "दिवसभरात तिचं फक्त हॅलो ऐकलं ना तरी मला कळतं ती बरी आहे की नाही. तिच्या हॅलोमुळे दिलासा मिळतो, तिचा आवाज ऐकला तरी ते पुरेसं असतं"
advertisement
7/7
या मुलाखतीत गिरीजाने एक मजेशीर गुपितही उघड केलं. गिरीजा आपल्या आईला लाडाने काय हाक मारते, हे ऐकून प्रेक्षकांनाही हसू आलं. गिरीजाच्या आईचं माहेरचं नाव 'बाबी' आहे, पण गिरीजा तिला कधीकधी प्रेमाने 'गट्टू' म्हणते. जेव्हा खूप दिवसांनी बोलणं होतं, तेव्हा गिरीजा हक्काने विचारते, "काय गं बाबी, काय चाललंय तुझं?"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Girija Oak: ना आई, ना मम्मी, ना मॉम; गिरिजा ओकने आईसाठी ठेवलंय क्यूट नाव, सांगितला नावामागचा हटके किस्सा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल