TRENDING:

Silver New Rules: चांदीच्या खरेदी-विक्रीचे नियम बदलणार, केंद्राचा मोठा अलर्ट; काय असणार नवे नियम समजून घ्या

Last Updated:

Silver News: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या आणि वेगाने वाढणाऱ्या चांदीबाबत केंद्र सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

advertisement
News18
News18
advertisement

नवी दिल्ली/मुंबई: भारतात चांदीच्या दागिन्यांबाबत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. ग्राहक संरक्षण अधिक मजबूत करण्याच्या दिशेने केंद्र सरकार चांदीच्या दागिन्यांना आणि चांदीच्या वस्तूंना अनिवार्य हॉलमार्किंगच्या कक्षेत आणण्याचा विचार करत आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी याबाबत माहिती दिली.

advertisement

सध्या देशात सोन्यासाठी हॉलमार्किंग सक्तीचे आहे, मात्र चांदीसाठी ही प्रक्रिया अजूनही स्वैच्छिक स्वरूपात आहे. BIS चे महासंचालक संजय गर्ग यांनी सांगितले की, चांदीसाठी अनिवार्य हॉलमार्किंगची मागणी उद्योगाकडून सातत्याने होत आहे. मात्र ते लागू करण्यापूर्वी नियामक चौकट, तपासणी क्षमता आणि अस्सेइंग (शुद्धतेची चाचणी) मानके यांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.

advertisement

चांदीच्या किंमतीवर महाभयंकर संकेत, सोन्यासाठी हाहाकार; क्रॅश की महातेजी

सध्या काय आहे नियम?

सध्याच्या स्वैच्छिक हॉलमार्किंग प्रणालीत, जे चांदीचे दागिने किंवा वस्तू हॉलमार्क केल्या जातात, त्यावर HUID (Hallmark Unique Identification) क्रमांक दिला जातो. हा सहा अंकी अल्फान्युमरिक कोड BIS च्या डेटाबेसद्वारे तपासता येतो, ज्यामुळे ग्राहकांना चांदीची शुद्धता आणि तिचा स्रोत पडताळून पाहता येतो.

advertisement

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या प्रणालीला हळूहळू प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 20 लाखांहून अधिक चांदीच्या वस्तूंना HUIDसह हॉलमार्किंग करण्यात आले आहे. 2024 मध्ये जिथे सुमारे 31 लाख चांदीच्या वस्तू हॉलमार्क करण्यात आल्या होत्या, तिथे 2025 मध्ये हा आकडा वाढून 51 लाखांपर्यंत पोहोचला आहे, असे गर्ग यांनी स्पष्ट केले.

advertisement

चांदी महागतेय, मागणी वाढतेय

जागतिक आणि देशांतर्गत बाजारात चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ होत असताना, दागिन्यांसाठी आणि गुंतवणुकीसाठी चांदीची मागणीही झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर चांदीच्या शुद्धतेबाबत, वजनाबाबत आणि दर्जाबाबतचे प्रश्न अधिक ठळकपणे पुढे येऊ लागले आहेत.

सरकारने याआधी सोन्यासाठी अनिवार्य हॉलमार्किंग लागू करताना आलेल्या अडचणी, त्रुटी आणि अंमलबजावणीतील अनुभवांचा अभ्यास सुरू केला आहे. त्यातून धडे घेतच चांदीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Budget 2026च्या आधीची सर्वात मोठी बातमी, सर्व काही बदलणार; काय आहे सरकारचा प्लॅन

HUID नियम आधीच लागू

जरी चांदीचे हॉलमार्किंग सक्तीचे नसले, तरी सप्टेंबर 2025 पासून एक महत्त्वाचा नियम लागू करण्यात आला आहे. ज्या चांदीच्या वस्तूंवर हॉलमार्किंग केली जाते, त्यावर HUID क्रमांक देणे बंधनकारक आहे. म्हणजेच एखाद्या ज्वेलरने चांदीचा दागिना हॉलमार्क केला, तर त्यावर HUID असणे आवश्यक आहे.

भारतात चांदीचे महत्त्व

भारत हा जगातील सर्वात मोठ्या चांदी ग्राहकांपैकी एक आहे. देशातील वार्षिक चांदीची मागणी 5,000 ते 7,000 टनांपर्यंत असल्याचा अंदाज आहे. मात्र देशांतर्गत उत्पादनातून यातील केवळ थोडीशीच गरज भागते. दागिने आणि चांदीच्या वस्तू यांचा एकूण वापरात मोठा वाटा आहे, त्यासोबतच औद्योगिक वापरही मोठ्या प्रमाणात होतो.

पुढे काय?

सध्या तरी चांदीसाठी अनिवार्य हॉलमार्किंग लागू करण्याची कोणतीही अंतिम वेळापत्रक निश्चित करण्यात आलेली नाही. उद्योगातील भागधारकांशी चर्चा, प्रयोगशाळांची क्षमता वाढवणे आणि तपासणी यंत्रणा सक्षम करणे या सगळ्या टप्प्यांनंतरच सरकार याबाबत अधिकृत अधिसूचना काढेल, असे BIS अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मराठी बातम्या/मनी/
Silver New Rules: चांदीच्या खरेदी-विक्रीचे नियम बदलणार, केंद्राचा मोठा अलर्ट; काय असणार नवे नियम समजून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल