Silver Price: चांदीच्या किंमतीवर महाभयंकर संकेत, सोन्यासाठी हाहाकार; 'क्रॅश' की महातेजी, खळबळजनक इशाऱ्याने धडधड वाढली

Last Updated:

Silver Price: चांदीबाबत 1980 नंतर पहिल्यांदाच असा संकेत तयार होताना दिसतो आहे, जो जागतिक बाजारात मोठ्या उलथापालथीचा इशारा देतो. आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार हा ट्रेंड कायम राहिला, तर चांदीच्या किमतींमध्ये अनपेक्षित आणि वेगवान वाढ होऊ शकते.

News18
News18
चांदीकडे आजही अनेकदा सोनेपेक्षा हलका धातू अशा पद्धतीने पाहिले जाते. पण इतिहास वेगळेच चित्र दाखवतो. जेव्हा चांदी वाढते करते, तेव्हा त्याचा वेग अनेकांना चकित करणारा असतो. आणि आता तब्बल 1980 नंतर पहिल्यांदाच असा मोठा संकेत तयार होताना दिसतो आहे, ज्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष चांदीकडे वळले आहे.
advertisement
एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार यावेळी चांदीच्या किमतींमध्ये तीन पटपर्यंत उडी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा संकेत नेमका काय आहे आणि त्याचा भारतातील सामान्य माणसावर काय परिणाम होऊ शकतो, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
सोने एक्सप्रेस, चांदी सुपरफास्ट
बाजाराची भाषा सोपी करून सांगायची तर, सोने म्हणजे एक्सप्रेस ट्रेन आणि चांदी म्हणजे सुपरफास्ट. जेव्हा बाजारात भीती, अनिश्चितता किंवा मोठे आर्थिक धक्के येतात, तेव्हा सर्वप्रथम सोने धाव घेते. पण एकदा तेजी स्थिर झाली की, चांदी वेगाने पुढे जाते आणि अनेकदा सोनेही मागे टाकते.
advertisement
सध्या दिसणारा संकेत थेट 1980 ची आठवण करून देणारा आहे. त्याच वर्षी चांदीने इतिहासातील सर्वात मोठी झेप घेतली होती.
Bank of America काय सांगते?
Bank of America च्या ताज्या अहवालात म्हटले आहे की 2026 च्या आसपास मौल्यवान धातूंमध्ये मोठी हालचाल पाहायला मिळू शकते. बँकेचे मेटल्स रिसर्च हेड मायकेल विडमर यांच्या मते, सोने पोर्टफोलिओसाठी सुरक्षित कवच राहीलच, पण सर्वाधिक चकित करणारा परतावा चांदी देऊ शकते.
advertisement
तो ‘महत्त्वाचा संकेत’ नेमका कोणता?
हा संकेत म्हणजे GoldSilver Ratio. म्हणजेच एका औंस सोन्याच्या किमतीत किती औंस चांदी येते. सध्या हा रेशो साधारण 59 च्या आसपास आहे.
इतिहास सांगतो की जेव्हा हा रेशो झपाट्याने खाली येतो, तेव्हा चांदीत जोरदार तेजी येते.
advertisement
-1980 मध्ये हा रेशो थेट 14 पर्यंत घसरला होता.
-2011 मध्ये तो 32 पर्यंत आला होता.
Bank of America चा अंदाज असा आहे की, इतिहासाची पुनरावृत्ती झाली तर चांदीचा दर 135 डॉलरपासून 309 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच सध्याच्या पातळीपेक्षा जवळपास तीन पट.
advertisement
भारतासाठी याचा अर्थ काय?
भारत हा जगातील सर्वात मोठ्या चांदी वापरणाऱ्या देशांपैकी एक आहे. इथे चांदी केवळ गुंतवणुकीपुरती मर्यादित नाही, तर दागिने, नाणी आणि औद्योगिक वापरासाठीही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. विशेषतः सोलर पॅनल, इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्रीन एनर्जी क्षेत्रात चांदीची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भारतात चांदीची मागणी आधीच मजबूत आहे.
advertisement
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी तीन पट वाढली, तर त्याचा थेट परिणाम देशांतर्गत किमतींवरही होईल. सध्याच्या अंदाजानुसार अशा परिस्थितीत भारतात चांदीचा भाव किलोमागे 7 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र हे डॉलर-रुपया दर, कररचना आणि धोरणात्मक बदलांवरही अवलंबून असेल.
सामान्य गुंतवणूकदाराने काय लक्षात ठेवावे?
जर चांदीला आजपर्यंत फक्त दागिन्यांपुरते मर्यादित मानले असेल, तर विचार बदलण्याची वेळ आली आहे. चांदीकडे आता गुंतवणुकीच्या पर्याय म्हणूनही पाहिले जात आहे. फिजिकल सिल्वर, सिल्वर ETF किंवा नाण्यांच्या माध्यमातून.
मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे की, चांदी हा उच्च जोखमीचा (हाय-रिस्क) पर्याय आहे. जितक्या वेगाने ती वर जाते, तितक्याच वेगाने ती खालीही येऊ शकते. त्यामुळे एकरकमी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने आणि विचारपूर्वक गुंतवणूक करणेच शहाणपणाचे ठरते, असे मायकेल विडमरही सांगतात.
Gold बद्दल काय?
विडमर यांच्या मते, सोने वरवर पाहता महाग वाटू शकते, पण प्रत्यक्षात ते अजूनही ‘अंडरइनवेस्टेड’ आहे. पोर्टफोलिओ डाइवर्सिफिकेशनसाठी सोने अजूनही कमी प्रमाणात वापरले जात आहे, आणि पुढील काळात त्याला अधिक वाव आहे. Bank of America चा अंदाज आहे की 2026 पर्यंत सोन्याचा दर 5,000 डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकतो. गुंतवणूक मागणीत मोठी वाढ झाली, तर हा दर 8,000 डॉलरपर्यंतही पोहोचू शकतो.
60/40 पोर्टफोलिओवर प्रश्नचिन्ह
परंपरागत 60% इक्विटी आणि 40% बाँड्सचा मॉडेल आता आव्हानात आला आहे, असेही अहवालात नमूद केले आहे. संशोधनानुसार पोर्टफोलिओमध्ये 20% सोने ठेवणे प्रभावी ठरू शकते, तर सध्याच्या जागतिक परिस्थितीत 30% पर्यंत सोने ठेवणेही योग्य मानले जाऊ शकते.
सेंट्रल बँका सोने का खरेदी करत आहेत?
जगभरातील सेंट्रल बँका सातत्याने सोने खरेदी करत आहेत. सध्या सरासरी सेंट्रल बँक रिझर्व्हमध्ये सोन्याचा वाटा 15% आहे. पण आदर्श संतुलनासाठी हा वाटा 30% असायला हवा, असे विडमर सांगतात.
अमेरिकेच्या व्याजदरांचा प्रभाव
जर अमेरिकेत व्याजदर कमी झाले आणि महागाई 2% च्या वर राहिली, तर सरासरी सोन्याच्या किमतींमध्ये 13% वाढ दिसून येते. म्हणजेच दर कपात झाली नाही तरी, दर कमी होण्याचा संकेतही सोन्यासाठी पुरेसा ठरतो.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Silver Price: चांदीच्या किंमतीवर महाभयंकर संकेत, सोन्यासाठी हाहाकार; 'क्रॅश' की महातेजी, खळबळजनक इशाऱ्याने धडधड वाढली
Next Article
advertisement
Santosh Dhuri Attack Raj Thackeray: कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
कमळ हाती घेताच संतोष धुरींचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल, मनातली खदखद काढली...
  • मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला

  • संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल

  • राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटल

View All
advertisement