"आता म्हणतात, 'आम्ही चूक केली!'", बॉलिवूडच्या बड्या स्टार्सनी रिजेक्ट केला 'रहमान डकैत' चा रोल, कास्टिंग डायरेक्टरचा भांडाफोड
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dhurandhar 2: 'धुरंधर' चित्रपटाच्या कास्टिंगचा अनुभव सांगताना, कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबडा यांनी खुलासा केला की, 'रहमान' या भूमिकेसाठी अक्षय खन्ना ही पहिली पसंती नव्हती.
advertisement
1/8

सध्या फक्त एकाच फिल्मचा बोलबाला आहे, तो म्हणजे धुरंधर २. अवघ्या सहा दिवसांमध्ये या फिल्मने ९०० कोटींचा गल्ला जमवला असून पहिल्याच आठवड्यात ही फिल्म १००० कोटींचा गल्ला जमवणार असल्याचं दिसतंय.
advertisement
2/8
रणवीर सिंह, संजय दत्त, आर माधवन, अर्जुन रामपाल या कलाकारांना पडद्यावर अक्षरशः आग लावली आहे. मात्र, या कलाकारांच्या परफेक्ट कास्टिंगमागे महत्त्वाचा वाटा आहे, तो म्हणजे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांचा.
advertisement
3/8
नुकतेच एका मुलाखतीत मुकेश यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत, ज्यामुळे बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुकेश यांनी सांगितलं की, धुरंधरच्या पहिल्या भागात सर्वांचं लक्ष वेधून घेणारा अक्षय खन्ना मुळातच या रोलसाठी पहिली पसंती नव्हती. मग त्याची निवड झाली तरी कशी?
advertisement
4/8
मुकेश यांनी खुलासा केला की, "आम्ही सुरुवातीला अनेक बड्या स्टार्सना या भूमिकेसाठी विचारले होते. पण मल्टी-स्टारर फिल्म असल्याने आणि इतर हिरोंच्या गर्दीत आपलं महत्त्व कमी होईल या भीतीने अनेकांनी हा रोल नाकारला. आज तेच अभिनेते मला फोन करून म्हणतात की त्यांनी तो रोल नाकारून मोठी चूक केली."
advertisement
5/8
मुकेश यांनी अक्षय खन्नाचाही एक गमतीशीर किस्सा सांगितला. ते म्हणाले, "जेव्हा मी अक्षयला या रोलबद्दल सांगितलं, तेव्हा त्याचं पहिलं वाक्य होतं 'मुकेश, तू वेडा झाला आहेस का?' त्याला वाटलं नव्हतं की तो अशा प्रकारचा क्रूर डाकू पडद्यावर साकारू शकेल. पण मी त्याला फक्त एकदा गोष्ट ऐकायला विनंती केली. नॅरेशन संपताच अक्षय म्हणाला- 'हे जबरदस्त आहे!' आणि एका दिवसात त्याने होकार दिला."
advertisement
6/8
नुकतेच अभिनेत्री अमिशा पटेलने धुरंधरच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत बॉलिवूडला टोमणा मारला होता. तिने म्हटलं होतं की आदित्य धरने फिल्म बनवली आहे, कोणताही प्रोजेक्ट नाही. त्यांनी पार्ट्यांमध्ये ट्रेंड होणाऱ्या इन्स्टाग्रामर्सना नाही, तर खऱ्या कलाकारांना कास्ट केलं आहे.
advertisement
7/8
अमिशाच्या या बोलण्यावरून सिद्ध होतं की आजकालच्या काळात केवळ सोशल मीडिया फॉलोइंग पाहून फिल्मसाठी कास्टिंग केलं जातं. यावर मुकेश छाबडा यांनी स्पष्ट केलं की, त्यांना डेटा रेकॉर्ड करायला आवडतो. पण ते इन्स्टाग्राम रील्स पाहून कोणालाही कास्ट करत नाही.
advertisement
8/8
'धुरंधर २' साठी त्यांच्या टीमने तब्बल दोन वर्षे मेहनत घेऊन २०० कलाकारांची निवड केली आहे. त्यांनी हेही सांगितलं की, त्यांच्यासाठी पात्राचा चेहरा महत्त्वाचा असतो, केवळ ग्रेट ॲक्टिंग नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
"आता म्हणतात, 'आम्ही चूक केली!'", बॉलिवूडच्या बड्या स्टार्सनी रिजेक्ट केला 'रहमान डकैत' चा रोल, कास्टिंग डायरेक्टरचा भांडाफोड