TRENDING:

'पकडले गेले कीच आणि तरच भोंदू?' अशोक खरात प्रकरणी मराठी अभिनेत्याची जळजळीत पोस्ट, सुनावले खडे बोल

Last Updated:
Ashok Kharat Crime News: सध्या महाराष्ट्रात एकच प्रकरण गाजतंय ते म्हणजे अशोक खरात नावाच्या भोंदूबाबाचे काळे धंदे. त्याचे कारनामे उघड झाल्यानंतर या प्रकरणी थेट मंत्रालयातील मोठी नावे समोर आल्याने एकच खळबळ उडाली.
advertisement
1/9
'पकडले गेले कीच आणि तरच भोंदू?' अशोक खरात प्रकरणी मराठी अभिनेत्याची जळजळीत पोस्ट
मुंबई : सध्या महाराष्ट्रात एकच प्रकरण गाजतंय ते म्हणजे अशोक खरात नावाच्या भोंदूबाबाचे काळे धंदे. त्याचे कारनामे उघड झाल्यानंतर या प्रकरणी थेट मंत्रालयातील मोठी नावे समोर आल्याने एकच खळबळ उडाली.
advertisement
2/9
जादूटोणा आणि मंत्रतंत्राच्या नावाखाली महिलांचे शोषण करण्याच्या त्याच्या या धंद्यात अनेक बडी मंडळी सामील असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. याच प्रकरणी अशोक खरातसोबतचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला.
advertisement
3/9
याच प्रकरणी आता मराठी सिनेसृष्टीतील एक मोठे नाव असलेल्या अभिनेत्याने आवाज उठवला असून त्याने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
advertisement
4/9
हा अभिनेता दुसरा कोणी नसून अतुल कुलकर्णी आहे. आपल्या रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जाणारे अतुल कुलकर्णी यांनी खरात प्रकरणी अतिशय मार्मिक पोस्ट लिहून समाज आणि सरकारला खडे सवाल विचारले आहेत.
advertisement
5/9
अतुल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "पकडले गेले कीच आणि तरच भोंदू ? त्या आधी ते काय असतात? आणि जे कधी पकडलेच जात नाहीत ते? ज्या वेळी कुणी महाराज भोंदू निघतात, तेव्हा त्यांचे भक्त नेमके कोण होतात, भागीदार, पीडित, अंधळे, अंधश्रद्धाळू, कमनशिबी, भाबडे, मूर्ख की आणखी कुणी?"
advertisement
6/9
त्यांनी पुढे म्हटलंय, "श्रद्धा, अंध कधी होते? डोळस श्रद्धा म्हणजे काय? डोळस आणि अंध श्रद्धामध्ये अंतर किती असतं? अंध होण्याला कारणीभूत कोण असतं? करणारे की होणारे ? अंधळं होणाऱ्यांवर त्याची काही जबाबदारी असते की नसते?"
advertisement
7/9
अखेर अतुल म्हणाले, "हे सगळं जितकं धर्मकारणाला लागू होतं (कुठल्याही धर्माच्या) तितकंच ते राजकारणालाही लागू होतं का (कुठल्याही पक्षाच्या)" या पोस्टमधून श्रद्धेच्या नावाखाली डोळ्यांवर पट्टी बांधणाऱ्या समाजाला अतुल कुलकर्णींनी आरसा दाखवला आहे.
advertisement
8/9
दरम्यान, अतुल कुलकर्णी यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याने अशाप्रकारे सामाजिक मुद्द्यावर आवाज उठवल्याने सर्वात मोठा तडाखा राजकारणाला बसला आहे.
advertisement
9/9
ज्याप्रमाणे भोंदूबाबांच्या मागे अंधभक्त धावतात, तसंच कोणत्याही विचारधारेचा विचार न करता राजकीय नेत्यांच्या मागे धावणारे लोकही त्याच श्रेणीत येतात का? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.<span style="font-size: 20px;"> </span><span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'पकडले गेले कीच आणि तरच भोंदू?' अशोक खरात प्रकरणी मराठी अभिनेत्याची जळजळीत पोस्ट, सुनावले खडे बोल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल