2025 संपायला 27 दिवस बाकी, त्याआधी पाहून टाका Prime Video वरील या ट्रेडिंग फिल्म आणि सीरिज
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Trending on Prime Video : प्राईम व्हिडीओवरील काही सीरिज आणि चित्रपटांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. जाणून घ्या प्राइम व्हिडीओवर ट्रेंड करत असलेल्या चित्रपट आणि सीरिजबद्दल.
advertisement
1/7

नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीओ, जिओ हॉटस्टार, सोनी लिव्ह अशा विविध प्लॅटफॉर्मवर प्रत्येक आठवड्याला अनेक नवे चित्रपट आणि सीरिज रिलीज होत असतात. विविध जॉनरच्या, वेगवेगळ्या धाटणीच्या या फिल्म आणि सीरिज ओटीटी लवर्सच्या पसंतीस उतरतात. 2025 च्या शेवटच्या महिन्यातही अनेक चित्रपटांना आणि सीरजला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
advertisement
2/7
डिसेंबर 2025 मध्ये प्राईम व्हिडीओवर अनेक बहुप्रतीक्षित फिल्म आणि सीरिज रिलीज होणार आहेत. पण सध्या काही सीरिज आणि फिल्म ओटीटीवर येताच ट्रेंड करत आहेत. या फिल्म आणि सीरिज पाहायच्या राहुल गेल्या असतील तर हे वर्ष संपण्याआधी नक्की पाहा.
advertisement
3/7
द फॅमिली मॅन 3 (The Family Man 3) : मनोज बाजपेयी आणि जयदीप अहलावत यांच्या 'द फॅमिली मॅन 3' या सीरिजला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. 21 नोव्हेंबर 2025 रोजी या सीरिजचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ओटीटीवर येताच या सीरिजने TOP 10 मध्ये आपली जागा निर्माण केली आहे. IMDB वर या सीरिजला 7.4 रेटिंग मिळाले आहे.
advertisement
4/7
कांतारा (Kantara) : 'कांतारा' हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. या फिल्मच्या हिंदी वर्जनला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तुम्ही अजूनपर्यंत ही फिल्म पाहिली नसेल तर ओटीटीवर नक्की पाहा.
advertisement
5/7
डीजल (Diesel) : 'डीजल' हा चित्रपट ओटीटीवर येताच ट्रेंड करत आहे. या चित्रपटाची दमदार कथा आणि स्टार कास्ट सर्वांना आवडत आहे. अजूनपर्यंत तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर प्राईम व्हिडीओवर आवश्य पाहा.
advertisement
6/7
टू मच विद काजोल अँड ट्विंकल (Two Much With Kajol and Twinkle) : काजोल आणि ट्विंकल खन्ना यांचा 'टू मच विद काजोल अँड ट्विंकल' या शोला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. ओटीटीवर येताच हा शो चौथ्या क्रमांकावर ट्रेंड करत होता. काहीतरी चांगलं आणि भन्नाट पाहायचा विचार करत असाल तर 'टू मच विद काजोल अँड ट्विंकल' हा ओटीटीवर शो आवश्य पाहा.
advertisement
7/7
कांतारा : अ लीजेंड-चॅप्टर 1 : प्राईम व्हिडीओवरील TOP 5 यादीत 'कांतारा : अ लीजेंड-चॅप्टर 1' या चित्रपटाचा समावेश आहे. तुम्ही अद्याप ऋषभ शेट्टी स्टारर हा चित्रपट पाहिला नसेल तर वीकेंडला नक्की पाहा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
2025 संपायला 27 दिवस बाकी, त्याआधी पाहून टाका Prime Video वरील या ट्रेडिंग फिल्म आणि सीरिज