लग्नाला झाले फक्त 20 दिवस, पुन्हा बोहल्यावर चढतेय बांदेकरांची सून; पूजा बिरारी वेडिंग लूक समोर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Pooja Birari : आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांचं नुकतंच लग्न झालं. रिअल लाइफनंतर पूजा ता रील लाइफ लग्नासाठी सज्ज झाली आहे.
advertisement
1/9

प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांचं 2 डिसेंबर 2026 रोजी लग्न झालं. या लग्नाची मराठी मनोरंजन विश्वात चांगलीच चर्चा झाली होती. पूजा आणि सोहम यांनी लोणावळ्यात लग्न केलं. लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक मंडळींनी उपस्थिती लावली होती.
advertisement
2/9
लग्नानंतर त्यांनी मुंबईत ग्रँड रिसेप्शन देखील ठेवलं होतं. अनेक दिग्गज कलाकार आणि नेते मंडळींनी रिसेप्शनला हजेरी लावली होती.
advertisement
3/9
सोहम आणि पूजा बिरारी यांच्या लग्नाला अवघे 20 दिवस झाले असतानाच पूजा बिरारी पुन्हा एकदा बोहल्यावर चढताना दिसणार आहे. मात्र यावेळी हे लग्न खऱ्या आयुष्यातलं नसून मालिकेतील आहे.
advertisement
4/9
पूजा बिरारी सध्या 'येड लागलं प्रेमाचं' या लोकप्रिय मालिकेत काम करतेय. मालिकेत ती प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या मालिकेत मंजिरी आणि राया यांचं लग्न प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
advertisement
5/9
या लग्नासाठी खास स्पेशल एपिसोड्सचं 23 आणि 24 डिसेंबर रोजी पाहायला मिळणार आहेत. राया आणि मंजिरी यांचा मालिकेतील लग्नाचा ट्रॅक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
advertisement
6/9
मालिकेतील लग्नासाठी पूजा बिरारी पुन्हा नवरीच्या वेशात दिसत आहे. तिचा वेडिंग लूक समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
advertisement
7/9
रिअल लाइफमध्ये नुकतंच लग्न झाल्यामुळे पूजाचा हा रील लाइफ वेडिंग लूक आणखी खास वाटत आहे. खऱ्या आयुष्यातील नवी नवरी आणि मालिकेतील नवरी असा दुहेरी अनुभव पूजा सध्या घेताना दिसतेय.
advertisement
8/9
लग्नानंतर पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांनी नव्या घरी संसार थाटला आहे. सुचित्रा बांदेकर यांनी सांगितल्याप्रमाणे दोघे बांदेकरांचं घर सोडून वेगळ्या घरी राहत आहेत.
advertisement
9/9
लग्नानंतर पूजा बिरारी लगेचच कामावर परतली आहे. पूजा आधी रिअल लाइफ लग्न आणि रील लाइफ लग्नाचा आनंद घेताना दिसतेय. एकीकडे खऱ्या लग्नाच्या आठवणी ताज्या असतानाच दुसरीकडे मालिकेतील लग्नाचे सीन्स पाहणं प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहेत. त्यामुळे 'येड लागलं प्रेमाचं' मधील मंजिरी-रायाच्या लग्ना'चं लग्न पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लग्नाला झाले फक्त 20 दिवस, पुन्हा बोहल्यावर चढतेय बांदेकरांची सून; पूजा बिरारी वेडिंग लूक समोर