TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रात मंगळवारी बर्फासारखी थंडी पडणार, हवामान खात्याकडून अलर्ट

Last Updated:
राज्यात थंडीला पोषक वातावरण असल्याने थंडीका कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. निफाड येथे राज्यातील निचांकी 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही थंडीचा कडाका कायम आहे. 
advertisement
1/7
महाराष्ट्रात मंगळवारी बर्फासारखी थंडी पडणार, हवामान खात्याकडून अलर्ट
राज्यात थंडीला पोषक वातावरण असल्याने थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. निफाड येथे राज्यातील नीचांकी 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही थंडीचा कडाका कायम आहे. तसेच राज्यातील सर्वच भागांत तापमानाचा पारा घसरला आहे. 23 डिसेंबर रोजी देखील राज्यात सर्वत्र तापमानात घट कायम आहे. पाहुयात, 23 डिसेंबर रोजी राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील.
advertisement
2/7
मुंबईतील तापमानात देखील आता काहीशी घट बघायला मिळत आहे. 23 डिसेंबर रोजी मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी दिवसभर धुकं पडण्याची शक्यता आहे. तसेच कोकण विभागात देखील काहीशी अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रात देखील थंडीचा कडाका कायम आहे. प्रमुख शहर असलेल्या पुणे शहरांत कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी धुक्यासह अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. तसेच इतरही शहरांत तापमानात घट असल्याने हुडहुडी कायम आहे.
advertisement
4/7
मराठवाड्यातही गारठा वाढला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी सकाळी धुके आणि नंतर मुख्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील इतर शहरांतही काहीशी अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
advertisement
5/7
उत्तर महाराष्ट्रातील पारा चांगलाच घसरला आहे. प्रमुख शहर असलेल्या नाशिकमधील कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 7 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी दिवसभर धुकं पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील इतर शहरांतही पारा चांगलाच घसरला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यांत 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच जळगावमध्ये सुद्धा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे.
advertisement
6/7
विदर्भातही गारठा कायम आहे. प्रमुख शहर असलेल्या नागपूरमधील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं. त्याठिकाणी मुख्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. विदर्भात थंडी कायम असून सकाळच्या वेळी गारठा तर दुपारच्या वेळी उन्हाचे चटके देखील सोसावे लागत आहेत. विदर्भातील नाशिक, गोंदिया आणि नागपूर येथील पारा 10 अंशाच्या खाली नोंदवला गेला आहे.
advertisement
7/7
राज्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. थंडीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी उबदार कपडे वापरा. थंडीचा कडाका जास्त असल्यास बाहेर पडणे टाळा. वृध्द आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रात मंगळवारी बर्फासारखी थंडी पडणार, हवामान खात्याकडून अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल