
कोल्हापूरयेथील राशिवडेमध्ये वडिलोपार्जित जमीनीवरुन भावकितच वाद झाले होते. त्यामुळे भावकित आपआपसात मोठी हाणामारी झाली. या हाणामारीत भावकितल्या लोकांनी लोखंडी रॉडने एकमेकांना मारले.या मारहाणीत एका महिलेसह चौघे जखमी झाले आहेत.जमीन मोजायला आलेल्या अधिकाऱ्यांनाही तेथील लोकांनी दमदाटी केली आहे. जमीन मोजायला आलेल्या अधिकाऱ्यांनाही तेथील लोकांनी दमदाटी केली.या हिंसक वर्तनामुळे राधानगरी पोलिस ठाण्यामध्ये संबंधितांवर परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला गेला.
Last Updated: Dec 22, 2025, 21:20 ISTधाराशिवमधील कळंब-लातूर रोडवर गंभीर अपघात झाला आहे.ऊसतोड मजूर मालकाकडून पैसे घेऊन कळंबच्या आठवड्याच्या बाजाराला आले होते.एकूण १३ मजूर बसची वाट पाहत थांबले होते.तेव्हा लातूरसाईड कडून येणाऱ्या कारने 7 जणांना उडवले. त्यातील 4 मजूर हे गंभीर जखमी झाले आहेत.वाहनचालक हा पसार झाला आहे. आदीवासी पारधी समाजातील हे मजूर होते. नातेवाईक मोठ्या प्रमाणावर या घटनेचा आक्रोश करत आहे.पोलिस त्याची पुढील चौकशी करत आहेत.
Last Updated: Dec 22, 2025, 21:59 ISTधाराशिवमधील बार्शीतील उक्कडगावच्या महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्याला बारावीच्या विद्यार्थ्यांनी रॅगिंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अकरावीतील विद्यर्थ्याने रुम मधील कचरा काढण्यास नकार दिला होता.त्यामुळे दारु पिऊन बारावीच्या विद्यार्थ्याने त्याचे रॅगिंग केले.जवळ येऊन एकाच कानाखाली सात ते आठ वेळा मारलं, त्यानंतर स्टंपने पायावर मारले. विद्यार्थ्याला तीन तास मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्याने केला आहे. एवढं होऊन महाविद्यालय आरोपी विद्यार्थ्यांना पाठीशी घालत आहे.
Last Updated: Dec 22, 2025, 21:40 ISTसांगलीच्या खानापूर तालुक्यातील भावळणी येथे एका फटाक्याच्या कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची घटना घडली.हा स्फोट इतका मोठा होता की आवाजाने भावळणी गाव आणि आसपासचा 5 किलोमीटर परिसर हादरला. स्फोट झाल्यावर तेथील आसपास असलेल्या वाहनांच्या काचांना तडे गेले.तर गावातील घरांमधील कपाटे आणि भांडी खाली पडली.यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले.या घटनेनंनतर जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्नालयात दाखल करण्यात आले. अफ्ताफ मन्सुर मुल्ला आणि अमिन मुल्ला अशी जखमी इसमांची नावे आहेत.तेथील विटानगर परिषद आणि खानापूरच्या अग्निशमन दलाने वेळीच येऊन ही आग आटोक्यात आणली.
Last Updated: Dec 22, 2025, 20:25 ISTकल्याण : मार्गशीर्ष महिन्याचे उपवास संपले की नॉनव्हेज प्रेमींना चिकन मटण खाण्याची नक्कीच इच्छा झाली असणार. पण नेहमीच चिकन, मटण खाऊन बोर झाला असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास चिकन रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्ही घरीच स्पेशल गार्लिक चिकन करू शकता. चला तर जाणून घेऊयात चमचमीत गार्लिक चिकन साधी आणि सोपी रेसिपी
Last Updated: Dec 22, 2025, 19:44 IST