TRENDING:

Urfi Javed: पहाटे 5 वाजता थरथरत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली उर्फी जावेद, 'त्या' रात्री असं घडलं तरी काय?

Last Updated:
उर्फी सोमवारी भल्या पहाटे ५ वाजता मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये दिसली. तिने स्वतः सोशल मीडियावर पोलीस स्टेशनमधील काही फोटो शेअर केले आहेत
advertisement
1/7
पहाटे 5 वाजता थरथरत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली उर्फी, 'त्या' रात्री असं घडलं काय?
मुंबई: नेहमी आपल्या अतरंगी फॅशन आणि बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी उर्फी जावेद आज एका वेगळ्याच आणि अत्यंत धक्कादायक कारणामुळे सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
advertisement
2/7
ग्लॅमरस दुनियेत वावरणारी उर्फी सोमवारी भल्या पहाटे ५ वाजता मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये दिसली. पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर कोणताही स्वॅग नव्हता, तर होती फक्त आणि फक्त भीती. उर्फीने स्वतः सोशल मीडियावर पोलीस स्टेशनमधील काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून तिचे चाहते चक्रावून गेले आहेत.
advertisement
3/7
२२ डिसेंबरच्या पहाटे जेव्हा सगळी मुंबई गाढ झोपेत होती, तेव्हा उर्फी आणि तिची बहीण डॉली जावेद मुंबईच्या दादाभाई नौरोजी (D.N. Nagar) पोलीस स्टेशनमध्ये वाट पाहत बसल्या होत्या. उर्फीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो पोस्ट केला, ज्याच्या कॅप्शनमध्ये तिने आपलं दुःख मांडलंय.
advertisement
4/7
उर्फी म्हणते, "सकाळचे ५ वाजले आहेत आणि मी पोलीस स्टेशनमध्ये आहे. माझ्या आयुष्यातील हा सर्वात भयानक अनुभव आहे. मी आणि माझी बहीण रात्रभर एक मिनिटही झोपू शकलो नाहीये." या पोस्टवरून एक गोष्ट स्पष्ट झाली की, काहीतरी अत्यंत गंभीर प्रकार घडला आहे ज्याने या दोन बहिणींना हादरवून सोडलंय.
advertisement
5/7
उर्फीसोबतच तिची बहीण डॉली हिनेही आपली कैफियत मांडली आहे. डॉलीने इन्स्टाग्रामवर लिहिलं की, "हा अनुभव अत्यंत किळसवाणा आणि भीतीदायक होता. मला वाटलं होतं की मुंबई सुरक्षित आहे, पण एका आठवड्यात माझ्यासोबत घडलेली ही दुसरी घटना आहे. मला इथे आता असुरक्षित वाटत आहे."
advertisement
6/7
एका आठवड्यात दोनदा असा अनुभव येणं, हे मुंबईसारख्या शहरात राहणाऱ्या कोणत्याही मुलीसाठी चिंताजनक आहे. मात्र, नेमकी कोणती घटना घडली, कोणी छेडछाड केली की आणखी काही? याबद्दल या दोन्ही बहिणींनी अजूनही अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही.
advertisement
7/7
उर्फी जावेद नेहमीच तिच्या कपड्यांमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. अनेकदा तिला सोशल मीडियावर जीवे मारण्याच्या किंवा बलात्काराच्या धमक्याही दिल्या जातात. पण यावेळी प्रकरण केवळ ट्रोलिंगचं नसून प्रत्यक्ष सुरक्षिततेचं असल्याचं दिसतंय. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Urfi Javed: पहाटे 5 वाजता थरथरत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली उर्फी जावेद, 'त्या' रात्री असं घडलं तरी काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल