दारू आणि एनर्जी ड्रिंक एकत्र पिणं किती धोकादायक? 99 टक्के लोक करतात 'या' चुका
- Published by:Devika Shinde
Last Updated:
काही मुलांना एनर्जी ड्रिंकसोबत दारु पिण्याची सवय लागली आहे. पण हा 'कॉम्बो तुमच्या शरीरासाठी एक 'सायलेंट किलर' ठरू शकतो.
advertisement
1/10

मद्यपान आणि एनर्जी ड्रिंक एकत्र पिण्याचा ट्रेंड सध्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. पार्टी असो किंवा निवांत संध्याकाळ, काहीतरी नवीन ट्राय करूया म्हणून अनेकजण रेडबुल किंवा तत्सम ड्रिंक्स दारूमध्ये मिसळून पितात. तर काही मुलांना एनर्जी ड्रिंकसोबत दारु पिण्याची सवय लागली आहे. पण हा 'कॉम्बो तुमच्या शरीरासाठी एक 'सायलेंट किलर' ठरू शकतो.
advertisement
2/10
आजकालच्या धावपळीच्या जगात आपण सण-उत्सव किंवा पार्टी साजरी करण्याची नवी पद्धत शोधली आहे. ऑफिसचा थकवा घालवण्यासाठी किंवा पार्टीत जास्त वेळ टिकून राहण्यासाठी अनेक तरुण अल्कोहोल एनर्जी ड्रिंक एकत्र पितात. दिसायला हे खूप स्टायलिश वाटत असलं, तरी विज्ञानाच्या भाषेत याला 'वाईड अवेक ड्रंक' (Wide Awake Drunk) म्हणतात.
advertisement
3/10
हे मिश्रण पिणाऱ्याला असं वाटतं की आपण फ्रेश आहोत आणि आपल्याला चढलेली नाही, पण प्रत्यक्षात तुमचं शरीर आतून पोखलं जातं. ही सवय तुमच्या आरोग्यासाठी किती महागात पडू शकते, हे जाणून घेणं आता गरजेचं झालं आहे.
advertisement
4/10
1. 'डाऊनर' आणि 'अप्पर'चा धोकादायक खेळदारू (Alcohol) हे एक 'डिप्रेसंट' (Depressant) आहे, म्हणजेच ते तुमच्या मेंदूला आणि शरीराला शांत करतं, सुस्त करतं. याउलट, एनर्जी ड्रिंकमध्ये मोठ्या प्रमाणात कॅफीन असतं, जे स्टिम्युलंट आहे, म्हणजेच ते तुमच्या मेंदूला अधिक सतर्क आणि सक्रिय करतं. जेव्हा तुम्ही ही दोन्ही टोकाची पेयं एकत्र पिता, तेव्हा तुमच्या मेंदूला गोंधळवणारे सिग्नल मिळतात. शरीर सांगतंय झोप आणि मेंदू सांगतंय जागे राहा. या संघर्षामुळे तुमच्या हृदयावर प्रचंड ताण येतो.
advertisement
5/10
2. 'वाईड अवेक ड्रंक' म्हणजे काय?एनर्जी ड्रिंकमधील कॅफीन दारूच्या गुंगीला दाबून टाकतं. त्यामुळे तुम्हाला आपण नशेत आहोत, असं वाटतच नाही. तुम्हाला वाटतं की तुम्ही अजून पिऊ शकता. यामुळे माणूस क्षमतेपेक्षा जास्त मद्यपान करतो. या अवस्थेत व्यक्तीला स्वतःवर नियंत्रण राहत नाही, पण तिला वाटतं की ती शुद्धीत आहे. अशा स्थितीत रस्ते अपघात किंवा वादविवाद होण्याची शक्यता सर्वाधिक असते.
advertisement
6/10
3. हृदयाच्या ठोक्यांवर परिणामएनर्जी ड्रिंक आणि दारूचे मिश्रण तुमच्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग अनियंत्रित करू शकतं. यामुळे 'पॅल्पिटेशन्स' (Heart Palpitations) जाणवू शकतात. काही गंभीर प्रकरणांमध्ये यामुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याचा धोकाही असतो, विशेषतः ज्यांना आधीच हृदयाचे थोडेफार विकार आहेत.
advertisement
7/10
4. डिहायड्रेशनचा दुप्पट धोकादारू प्यायल्याने शरीरातील पाणी कमी होतं (Dehydration). त्यात पुन्हा कॅफीनयुक्त एनर्जी ड्रिंक घेतल्याने लघवीचे प्रमाण वाढते. या दोन्हीमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वेगाने घटते. दुसऱ्या दिवशी होणारा 'हँगओव्हर' हा या मिश्रणामुळे अधिक तीव्र आणि वेदनादायक असतो.
advertisement
8/10
5. पचनसंस्थेवर परिणामदारू आणि साखरेने भरलेली एनर्जी ड्रिंक्स एकत्र घेतल्याने पोटात ॲसिडिटी वाढते. यामुळे उलट्या होणे, पोटात जळजळ होणे आणि दीर्घकाळात यकृत (Liver) आणि स्वादुपिंडावर (Pancreas) गंभीर परिणाम होऊ शकतात.
advertisement
9/10
मजा की सजा?पार्टीची मजा घेणं चुकीचं नाही, पण ती जीवावर बेतणारी नसावी. जर तुम्हाला मद्यपान करायचेच असेल, तर ते मर्यादेत करा आणि त्यात साधे पाणी किंवा सोडा मिसळणे कधीही चांगले. एनर्जी ड्रिंक हे खेळाडूंसाठी किंवा थकवा घालवण्यासाठी बनवलेले असते, दारूमध्ये मिसळण्यासाठी नाही. लक्षात ठेवा, एक रात्रीची 'क्रेझी पार्टी' तुमच्या आयुष्यभराच्या आरोग्याला ग्रहण लावू शकते. त्यामुळे पुढच्या वेळी हा कॉम्बो ट्राय करण्यापूर्वी आपल्या हृदयाचा विचार नक्की करा.
advertisement
10/10
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी मद्यपानासाठी प्रोत्साहन देत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
दारू आणि एनर्जी ड्रिंक एकत्र पिणं किती धोकादायक? 99 टक्के लोक करतात 'या' चुका