Prajakta Mali : देखणी सुरत, नाही हटत कुणाच्या नजरा; प्राजक्ता माळीचे साडीतील खास फोटो! चाहते घायाळ
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Prajakta Mali: महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली, आपल्या दिलखेचक हास्याने आणि सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
advertisement
1/7

महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली, आपल्या दिलखेचक हास्याने आणि सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिने केवळ मालिका आणि चित्रपटांमध्येच नव्हे, तर सूत्रसंचालन आणि आता उद्योजिका म्हणूनही आपले स्थान निर्माण केले आहे.
advertisement
2/7
प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल माडियावरही बरीच सक्रिय असते. फोटो, व्हिडीओ लाइफ अपडेट ती सोशल मीडियावरुन देत असते.
advertisement
3/7
प्राजक्ताने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. साडीतील तिच्या फोटोंवर चाहते तर घायाळच झालेत. तिच्या या लेटेस्ट फोटोनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
advertisement
4/7
प्राजक्ताने तिचे साडीतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताच चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव पहायला मिळत आहे. अनेकांनी म्हटलं, स्टनिंग, नॅचरल ब्यूटी, क्या अदा क्या जलवे तेरे प्राजु, देखणी सुरत ...नाही हटत कुणाच्या नजरा... तुझं रूप हाय भारी, अशा अनेक वेगवेगळ्या कमेंट पोस्टवर पहायला मिळत आहे.
advertisement
5/7
या फोटोशूटमुळे प्राजक्ता पुन्हा चर्चेत आली असून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पारंपारिकच नाही तर ग्लॅमरनेही ती लक्ष वेधून घेत असते. कधी पारंपारिक तर कधी ग्लॅम अवतार तिचा पहायला मिळत असतो.
advertisement
6/7
प्राजक्ताने सुरुवातीला काही मालिका आणि नाटकांमध्ये काम केले, परंतु तिला खरी ओळख मिळाली ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या झी मराठीवरील लोकप्रिय कॉमेडी शोच्या सूत्रसंचालनामुळे. गेली अनेक वर्षे ती या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
advertisement
7/7
तिच्या 'वाह दादा वाह!' या डायलॉगने आणि खळखळून हसण्याच्या शैलीने तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या कार्यक्रमातून ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आणि 'हास्यजत्रेची होस्ट' म्हणून तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali : देखणी सुरत, नाही हटत कुणाच्या नजरा; प्राजक्ता माळीचे साडीतील खास फोटो! चाहते घायाळ