TRENDING:

Prasad Oak: 'पोटचा मुलगाही माझ्या जवळ येईना' प्रसाद ओकसोबत नेमकं काय झालं? सांगितला वेदनादायी प्रसंग

Last Updated:
Prasad Oak:मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता, एक उत्तम दिग्दर्शक म्हणजे प्रसाद ओक. तो नेहमीच त्याचा सिनेमा, मालिका, रिअॅलिटी शोजमुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावरही बराच सक्रिय असतो.
advertisement
1/7
'पोटचा मुलगाही माझ्या जवळ येईना' प्रसाद ओकसोबत नेमकं काय झालं?
मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता, एक उत्तम दिग्दर्शक म्हणजे प्रसाद ओक. तो नेहमीच त्याचा सिनेमा, मालिका, रिअॅलिटी शोजमुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावरही बराच सक्रिय असतो.
advertisement
2/7
अभिनेता प्रसाद ओक केवळ उत्तम दिग्दर्शक आणि कलाकारच नाहीत, तर एक संवेदनशील कुटुंबवत्सल व्यक्तीही आहे. अलीकडेच त्याच्या आगामी ‘वडापाव’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यानी एक भावनिक प्रसंग सांगितला ज्याने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणले.
advertisement
3/7
रत्न मराठी मीडियाला दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीत प्रसाद ओक म्हणाला एक वेळ अशी आली होती की, माझा पोटचा मुलगाच माझ्या जवळ येत नव्हता. त्याने यामागचं कारणंही सांगितलं ज्याने तुम्हीही भावूक व्हाल.
advertisement
4/7
प्रसाद म्हणाला, "एक काळ असा होता की, माझ्या कामाच्या व्यापामुळे मी घरापासून दूर राहायचो. त्यावेळी मी ‘भांडा सौख्यभरे’ हा लोकप्रिय शो करत होतो. महाराष्ट्रभर फिरत असल्याने सलग 20-25 दिवस घरापासून लांब राहायचो. तो कार्यक्रम एवढा लोकप्रिय होता की त्याचे तब्बल 1200 एपिसोड झाले. पण त्या यशाच्या मागे माझ्या कुटुंबाची खूप किंमत चुकवावी लागली."
advertisement
5/7
प्रसाद म्हणाला की, "त्या वेळी माझा मुलगा फक्त दोन-तीन वर्षांचा होता. आणि मी जेव्हा 20-25 दिवसांनी घरी आलो तेव्हा त्याने मला ओळखलंच नाही. तो माझ्याकडे असा बघत होता जणू मी अनोळखी आहे. त्याचं तसं वागणं माझ्या मनाला भयंकर लागलं पण कामापुढे काही पर्याय नसतो."
advertisement
6/7
या घटनेनंतर प्रसाद ओकने स्वतःसाठी एक नियम ठरवला. तो म्हणाले, 'आजही मी आमच्या कुटुंबात कोणाचाही वाढदिवस असला, लग्नाचा वाढदिवस असला तर त्या दिवशी काम करत नाही. त्या दिवशी फक्त कुटुंबासाठी असतो. कारण ती वेळ पुन्हा परत येत नाही.'
advertisement
7/7
दरम्यान, प्रसाद ओक दिग्दर्शित आगामी 'वडापाव' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही एका गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी आहे. या सिनेमात गौरी नलावडे, अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री झळकणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prasad Oak: 'पोटचा मुलगाही माझ्या जवळ येईना' प्रसाद ओकसोबत नेमकं काय झालं? सांगितला वेदनादायी प्रसंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल