Priya Bapat : असुर फेम अभिनेत्यासोबत झळकणार प्रिया बापट; अभिनेत्रीच्या नव्या हिंदी वेब सीरिजचं नाव समोर
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून प्रिया बापटला ओळखलं जातं. अनेक चित्रपट, मालिका, नाटक आणि वेब सीरिजमध्ये काम करून तिने अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. प्रिया बापटने मराठी सोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नुकतच प्रियानं आगामी प्रोजेक्टची माहिती देत सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय.
advertisement
1/8

प्रिया बापटची सिटी ऑफ ड्रीम्स ही हिंदी वेब सीरिज चांगलीच लोकप्रिय झाली होती. त्यानंतर प्रिया पुन्हा नव्या सिरीजमध्ये झळकणार आहे.
advertisement
2/8
प्रियाने सोशल मीडियावरून नव्या वेब सिरीजची घोषणा केली आहे. ती लवकरच 'रात जवान है' या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
advertisement
3/8
'रात जवान है' या शोच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
advertisement
4/8
'रात जवान है' या मध्ये प्रिया बापट सोबत बरूण सोबती, अंजली आनंद हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
advertisement
5/8
या सिरीजची कथा तीन मित्रांवर आधारित आहे जे मुल झाल्यानंतरही त्यांच्या मैत्रीसाठी वेळ काढतात आणि आयुष्याचा भरपूर आनंद घेतात.
advertisement
6/8
'सोनी लिव्ह' ॲपवर 'रात जवान है' हि सीरिज रिलीज होणार आहे.
advertisement
7/8
प्रिया बापटनं नुकतेच 'रात जवान है' या सेटवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो शेअर करत तिने "यारा ओ यारा मिलना हमारा जाने क्या रंग लाए गा". असं म्हटलं आहे.
advertisement
8/8
आता प्रियाच्या आगामी शोची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Priya Bapat : असुर फेम अभिनेत्यासोबत झळकणार प्रिया बापट; अभिनेत्रीच्या नव्या हिंदी वेब सीरिजचं नाव समोर