राजेश खन्नाची बोल्ड हिरोईन, बापानेच काढला अभिनेत्रीचा काटा; बंगल्यात गाडले मृतदेह, कारण ऐकून थरकाप उडेल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत काही मृत्यू असे असतात जे वर्षानुवर्षे गूढ बनून राहतात, तर काही इतके क्रूर असतात की ऐकूनच अंगावर काटा येतो.
advertisement
1/8

बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत काही मृत्यू असे असतात जे वर्षानुवर्षे गूढ बनून राहतात, तर काही इतके क्रूर असतात की ऐकूनच अंगावर काटा येतो. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत काम केलेल्या एका ग्लॅमरस अभिनेत्रीची अशीच एक हृदयद्रावक कहाणी आजही अनेकांच्या स्मरणात आहे.
advertisement
2/8
ही गोष्ट आहे अभिनेत्री लैला खान हिची. १९७८ मध्ये जन्मलेल्या रेश्मा पटेलने 'लैला खान' या नावाने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. २००८ मध्ये तिने राजेश खन्ना यांच्यासोबत 'वफा: ए डेडली लव्ह स्टोरी' या चित्रपटात काम केलं. पण तिला काय माहीत होतं की, खऱ्या आयुष्यातही मृत्यूची एक भयानक गोष्ट तिची वाट पाहत आहे.
advertisement
3/8
२०११ मध्ये लैला खान आपल्या आईसोबत आणि संपूर्ण कुटुंबासह सुट्टी साजरी करण्यासाठी इगतपुरी येथील आपल्या फार्महाऊसवर गेली होती. पण तिथून अचानक हे संपूर्ण कुटुंब बेपत्ता झालं.
advertisement
4/8
लैलाचे वडील नादिर शाह यांनी ५ जण गायब झाल्याची तक्रार नोंदवली. संशयाची सुई होती लैलाची आई सेलिना हिचे तिसरे पती इकबाल टाक आणि आसिफ शेख यांच्यावर. लैला एका मोठ्या चित्रपटाचं शूटिंग अर्ध्यावर सोडून गेली होती, त्यामुळे संशय अधिकच बळावला.
advertisement
5/8
मुंबई पोलिसांनी जेव्हा तपास चक्र फिरवली, तेव्हा या प्रकरणाचे धागेदोरे थेट काश्मीरपर्यंत पोहोचले. तिथून पोलिसांनी परवेझ इकबाल टाकला ताब्यात घेतलं. पोलिसांनी जेव्हा त्याला पोलिसी खाक्या दाखवला, तेव्हा त्याने जे सांगितलं ते ऐकून तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
advertisement
6/8
इकबालने कबूल केलं की, त्याने केवळ लैलाची आई सेलिनाच नाही, तर लैला आणि कुटुंबातील इतर सदस्यांचीही निर्घृण हत्या केली. त्याचं कारण होतं, पैसा आणि प्रॉपर्टी.
advertisement
7/8
सेलिनाने आपली सर्व मालमत्ता तिचा दुसरा पती आसिफ याच्या नावावर केली होती, ज्याचा इकबालला प्रचंड राग होता. रागाच्या भरात त्याने आधी सेलिनाला मारलं आणि या हत्येचे साक्षीदार उरू नयेत म्हणून लैलासह घरातील पाच निष्पाप जीवांचा बळी घेतला.
advertisement
8/8
हत्या केल्यानंतर इकबालने सर्वांचे मृतदेह फार्महाऊसमध्येच गाडून टाकले होते. जेव्हा पोलीस तिथे पोहोचले, तेव्हा त्यांना हा नरसंहार पाहून धक्काच बसला. हे प्रकरण इतकं भीषण होतं की, न्यायालयाने याला दुर्मिळातील दुर्मिळ श्रेणीत टाकलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
राजेश खन्नाची बोल्ड हिरोईन, बापानेच काढला अभिनेत्रीचा काटा; बंगल्यात गाडले मृतदेह, कारण ऐकून थरकाप उडेल