'हे कायमचं संपवून टाका', राजकुमार राव संतापला; नेमकं काय घडलं?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Rajkumar Rao : मनीषा गोस्वामी यांनी आपल्या सासरच्या मंडळींवर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. त्यांच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेवर राजकुमार राव यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
advertisement
1/7

अभिनेता राजकुमार रावने छत्तीसगडमधील एका 23 वर्षीय महिलेच्या आत्महत्येवर आपलं दु:ख आणि संताप व्यक्त केला आहे. महिलेने लग्नानंतर फक्त 10 महिन्यातच टोकाचं पाऊल उचललं. महिलेने आपला पती आणि सासरच्या मंडळींवर हुंडाबळी, शारिरीक आणि मानसिक छळाचा आरोप केला होता.
advertisement
2/7
रायपुरच्या मनीषा गोस्वामी नामक महिलेने आत्महत्या करण्याआधी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडीओमध्ये मनीषा यांनी त्यांचे पती आशुतोष गोस्वामी आणि सासरच्या मंडळींनी जानेवारीत लग्न झाल्यानंतर लगेचच शारीरिक आणि मानसिक छळ करायला सुरुवात केली असल्याचा आरोप केला आहे.
advertisement
3/7
मनीषा गोस्वामी या धक्कादायक प्रकरणाचा व्हिडीओ राजकुमार रावने सोशल मीडियावर शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे.
advertisement
4/7
राजकुमार रावने लिहिलं आहे,"मनीषा गोस्वामी यांची ही बातमी हृदय पिळवटून टाकणारी आहे. आता वेळ आली आहे की आपण आपल्या देशातून या हुंडा प्रथे कायमंच संपवलं पाहिजे. एकमेकांना या कुप्रथेतून वाचण्यासाठी प्रेरित करूया".
advertisement
5/7
राजकुमार रावला दुजोरा देत नेटकऱ्यांनीही देशातील हुंड्यासंबंधीतील छळ आणि घरगुती हिंसाचाराच्या वाढत्या समस्येबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे.
advertisement
6/7
मनीषा आपल्या व्हिडिओमध्ये म्हणालेल्या,“मी माझ्या भावंडांमध्ये सर्वात मोठी आहे आणि माझे वडील एकटे कमावणारे आहेत. मी माझ्या सासरच्या लोकांच्या सततच्या छळामुळे थकली आहे. आता मी आयुष्याला कंटाळली असून माझ्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. नवऱ्याने कोणतेही कारण नसताना दोन वेळा मारहाण केली आणि सासूने त्याला साथ दिली. माझ्या दहा महिन्यांच्या लग्नात मला दहा दिवसही आनंद अनुभवायला मिळाला नाही".
advertisement
7/7
मनीषा गोस्वामीच्या वडिलांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली असून सध्या चौकशी सुरु आहे. पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांचे आणि शेजाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत.