Rashmika Vijay : रश्मिका-विजयच्या घरी आली चिमुकली पाहुणी; देवरकोंडा कुटुंबाने केलं दमदार स्वागत
- Published by:Priya Lad
Last Updated:
Rashmika Mandanna Vijay Deverakonda : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या 20 दिवसांनंतर त्यांच्या घरी या चिमुकल्या पाहुणीचं दमदार वेलकम करण्यात आलं आहे.
advertisement
1/7

अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या लग्नाला 20 दिवस उलटून गेले आहेत. आता त्यांच्या घरी एका चिमुकली पाहुणीचं आगमन झालं आहे. दोघांनी मिळून तिचं दमदार स्वागत केलं आहे.
advertisement
2/7
रश्मिका आणि विजयच्या घरी आलेल्या या चिमुकलीसाठी विजय आणि रश्मिका यांनी घरात जेवण तयार केलं आणि स्वत:च्या हाताने तिला खाऊ घातलं. रश्मिकाने तिच्या ताटात लाडू दिला तर विजयने तिला भात वाढला.
advertisement
3/7
चिमुकलीला जे जे काही हवं ते सगळं या कपलने दिलं. तिला डोक्यावर किस केलं, तिला घरात घेऊन फिरले आणि तिला खूप खूप प्रेम दिलं.
advertisement
4/7
ही चिमुकली कोण आहे माहिती आहे का? ही मुलगी तीच जी विजय-रश्मिकाच्या लग्नानंतर व्हायरल झाली होती. आपल्याला विजय-रश्मिकाने लग्नाला बोलावलं नाही म्हणून ती नाराज होती आणि ही नाराजी तिने सोशल मीडियावर व्यक्त केली.
advertisement
5/7
विजय आणि रश्मिका मी तुमची मोठी फॅन आहे, तुम्ही मला तुमच्या लग्नाला का बोलावलं नाही, असं तिने व्हिीडओ पोस्ट करत विचारलं.
advertisement
6/7
विजय आणि रश्मिका यांनी या मुलीची पोस्ट पाहिली आणि विजयने तिला तुला आम्ही घरी बोलावून जे काही आवडतं ते खाऊ घालू असं आश्वासन दिलं आणि त्यांनी ते आश्वासन पूर्ण केलं आहे. विजय-रश्मिकाने त्या व्हायरल गर्लला तिच्या कुटुंबासह घरी बोलावलं आणि तिचा चांगला पाहुणचार केला.
advertisement
7/7
देवरकोंडा कुटुंबासोबत या मुलीच्या कुटुंबाने जेवण केलं. मुलीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरच हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तसंच त्यांचे फोटोही रश्मिका मंदानाच्या फॅन पेजवर पोस्ट करण्यात आले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rashmika Vijay : रश्मिका-विजयच्या घरी आली चिमुकली पाहुणी; देवरकोंडा कुटुंबाने केलं दमदार स्वागत