हाती मशाल घेत रस्त्यावर उतरली रवीना टंडन, शिवसेनेच्या प्रचारासाठी पिंजून काढली मुंबई, PHOTO VIRAL
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bmc Election: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) रणधुमाळीत आता बॉलिवूडचा तडका लागला आहे. १२ जानेवारी २०२६ रोजी मुंबईच्या रस्त्यांवर एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं.
advertisement
1/9

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) रणधुमाळीत आता बॉलिवूडचा तडका लागला आहे. आज, १२ जानेवारी २०२६ रोजी मुंबईच्या रस्त्यांवर एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं.
advertisement
2/9
९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि सर्वांची लाडकी 'मस्त मस्त' गर्ल रवीना टंडन चक्क उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या (उबाठा) प्रचारासाठी वांद्रे येथील अरुंद गल्ल्यांमध्ये फिरताना दिसली.
advertisement
3/9
गळ्यात मशाल चिन्हाचा स्कार्फ आणि चेहऱ्यावर स्मितहास्य घेऊन रवीना जेव्हा लोकांच्या भेटीला आली, तेव्हा चाहत्यांनी तिला पाहण्यासाठी एकच गर्दी केली.
advertisement
4/9
वांद्रे पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १०१ मधील उबाठा शिवसेनेच्या उमेदवार अक्षता मिनेजेस यांच्या समर्थनासाठी रवीनाने कंबर कसली आहे. काल, रविवारी चिंबई ते कांतवाडी परिसरात ठाकरे गटाने एक भव्य रोड शो आणि पदयात्रा आयोजित केली होती.
advertisement
5/9
यावेळी रवीना टंडनने केवळ हजेरीच लावली नाही, तर घरोघरी जाऊन रहिवाशांशी संवादही साधला. साधा कुर्ता, अंबाडा आणि गळ्यात शिवसेनेच्या नावाचा लाल पट्टा अशा साध्या पण प्रभावी लूकमध्ये रवीना कार्यकर्त्यांसोबत चालताना दिसली.
advertisement
6/9
प्रचारादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना रवीना म्हणाली, "महाराष्ट्राची संस्कृती आणि इथली अस्मिता जपण्यासाठी जे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, त्यांना पाठिंबा देणं हे माझं कर्तव्य आहे. संकटकाळात ज्या पद्धतीने काम झालं, ते खरोखरच कौतुकास्पद आहे."
advertisement
7/9
रवीनाच्या या विधानामुळे ती केवळ प्रचारासाठी आली आहे की भविष्यात सक्रिय राजकारणात प्रवेश करणार? अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.
advertisement
8/9
मुंबई महानगरपालिकेसाठी येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून अवघे तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे.
advertisement
9/9
रॅली, कॉर्नर मीटिंग आणि रोड शोच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच रवीना टंडनसारख्या मोठ्या स्टारने ठाकरे गटासाठी मैदानात उतरणं, हे विरोधकांसाठी मोठं आव्हान मानलं जातंय<span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हाती मशाल घेत रस्त्यावर उतरली रवीना टंडन, शिवसेनेच्या प्रचारासाठी पिंजून काढली मुंबई, PHOTO VIRAL