Renuka Shahane : 'काय हसते...' नातेवाईक मारायचे टोमणे, त्याच स्माइलनं घडवलं रेणुका शहाणेंचं करिअर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Renuka Shahane Smile : ज्या स्माइलने अभिनेत्री रेणुका शहाणे यांना ओळख दिली. त्याच स्माइलवरून त्यांच्या घरचे त्यांना टोमणे मारायचे.
advertisement
1/7

Renuka 90च्या दशकातील एक अभिनेत्री जिनं अनेकांना मोकळेपणाने आणि दिलखुलासपणे हसणं शिकवलं. तिच्या एका स्माइलनेच लाखो लोकांनी मनं जिंकली. अभिनेत्रीनं तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या स्मित हास्याने प्रेक्षकांची मनं जिंकली.
advertisement
2/7
जी स्माइल या अभिनेत्रीची ओळख ठरली तिच स्माइल करू नको म्हणून तिच्या कुटुंबीयांनी कधी काळी दिला दमदाटी केली होती. अभिनेत्रीनं नुकत्याच एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला.
advertisement
3/7
आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय ती अभिनेत्री म्हणजेच रेणुका शहाणे. 'सुरभी', 'हम आपके है कौन' सारखे सिनेमा आणि अनेक मालिकांमधून रेणुका शहाणे यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. लहान असताना अभिनेत्रीनं आजी आणि नातेवाईकांकडून जास्त हसू नकोस म्हणून ओरडा खाल्ला होता.
advertisement
4/7
आरपारला दिलेल्या मुलाखतीत बोलताना रेणुका शहाणे यांना त्यांच्या स्माइलबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी मी लहानपणापासून अशीच हसते असं सांगितलं. त्या म्हणाल्या, "ती गोष्ट त्या काळात खूपच नवीन होती. पण माझ्यासाठी खूपच नैसर्गिक होती. मी लहानपणापासून अशीच हसते."
advertisement
5/7
रेणुका शहाणे यांनी शाळेतील एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, "नववीत असताना मला ब्रेसेस होते. त्याकाळातली ब्रेसेस स्टिलचे असायचे. अशा ब्रेसेसवाल्या मुलींना कधी हसूच नये असंच लोकांना वाटायचं, कारण ते भयानक दिसतं. त्यातही मी तशीच हसायचे. मला शाळेत जॉज वगैरे म्हणायचे."
advertisement
6/7
"लहानपणापासून माझ्या आजीपासून नातेवाईकांपासून सगळ्यांनी मला सांगितलेलं आहे होतं की, तोंड फाटून इतकं हसायची काय गरज आहे."
advertisement
7/7
रेणुका शहाणे पुढे म्हणाल्या, "मला माहिती नाही माझी जिवणीच तशी आहे की काय. मी कमीच हसूच शकत नाही. मी नॉर्मल चेहरा ठेवला तर लोक म्हणतात एवढी गंभीर का आहेस? काय प्रोब्लेम झालाय आणि मग मी हसले की अशीच हसते."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Renuka Shahane : 'काय हसते...' नातेवाईक मारायचे टोमणे, त्याच स्माइलनं घडवलं रेणुका शहाणेंचं करिअर