Comedian Networth: कोट्यवधींची कमाई करतायत हे 'धुरंधर' कॉमेडियन्स, संपत्तीचा आकडा ऐकून हैराण व्हाल!
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
कायमच प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणाऱ्या 'द कपिल शर्मा शो'ची कायमच प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होते. या कॉमेडी शोमधले सर्व कलाकार कायमच प्रेक्षकांमध्ये कमालीचे चर्चेत असतात. ज्या शोने या कलाकारांना भारतासह जगभरामध्ये स्टारडम दिलंय, सर्वच कॉमेडीस्टार किती कोटींचे मालक आहेत? जाणून घेऊया...
advertisement
1/7

भारतासह जगभरामध्ये कॉमेडियन्स म्हणून प्रसिद्धी मिळवलेले टिव्ही कलाकार कॉमेडी शोच्या माध्यमातून करोडोंची कमाई करतात. 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'च्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवलेल्या सर्व कलाकारांना एका एपिसोडसाठी करोडो रूपये फी मिळते.
advertisement
2/7
आपल्या उत्कृष्ट कॉमिक टायमिंगने कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी ते कोणतीही कसर सोडत नाहीत. या यादीत कपिल शर्मा, कृष्णा अभिषेक, भारती सिंग, सुनील ग्रोवरसह अनेक सेलिब्रिटींनी स्थान मिळवलंय. 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मधील कलाकार किती करोडोंचे मालक आहेत, जाणून घेऊया...
advertisement
3/7
'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'चा कॅप्टन ऑफ शिप म्हणजे कपिल शर्माकडे पाहिले जाते. कपिल शर्माकडे कायमच उत्तम कॉमेडियन म्हणून पाहिले जाते. त्याच्या कॉमेडीचे फक्त देशातच नाही तर जगभरात लाखो फॅन्स आहेत. कपिलकडे 300 कोटींची संपत्ती आहे.
advertisement
4/7
लाफ्टर शेफ्स शोमध्ये चाहत्यांना खळखळून हसवणाऱ्या कृष्णा अभिषेकचाही चाहतावर्ग फार मोठा आहे. तो फक्त 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' मुळेच नाही तर त्याच्या वेगवेगळ्या कलाकृतींतून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध झाला आहे. अभिषेककडे एकूण 50 कोटींच्या आसपासची संपत्ती आहे.
advertisement
5/7
लाफ्टर क्वीन भारती सिंगने अलीकडेच दुसर्‍या मुलाला जन्म दिला. सध्या ती 'लाफ्टर शेफ्स' मध्ये होस्टिंग करताना दिसत आहे. ती एक फेमस कॉमेडियन असून फेमस होस्ट सुद्धा आहे. ती टिव्ही शो आणि यूट्यूबमधून पैसे कमवते. रिपोर्ट्सनुसार, भारतीची अंदाजे एकूण संपत्ती 25- 30 कोटी रुपये इतकी आहे.
advertisement
6/7
सुनील ग्रोव्हर 'द कपिल शर्मा शो'च्या माध्यमातून घराघरात प्रसिद्ध झाला. तो त्याच्या मिमिक्री आणि कॉमिक टायमिंगसाठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो. त्याने अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करत चाहत्यांना आपलसं केलं. सध्या तो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सात वर्षांनंतर तो कपिल शर्मासोबत एकत्र आला आहे. सुनील ग्रोव्हरची अंदाजे संपत्ती 21 कोटी रुपये आहे.
advertisement
7/7
किकू शारदा हा प्रसिद्ध विनोदी कलाकार आहे. त्याने आपल्या कॉमेडी कॉमिकने सर्वांचे खळखळून मनोरंजन केले. किकू शारदाने अनेक चित्रपट आणि कॉमेडी शोमध्ये काम केले आहे. पण किकूला 'द कपिल शर्मा शो' मुळे विशेष ओळख मिळाली. किकू शारदाची एकूण संपत्ती 33 ते 40 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Comedian Networth: कोट्यवधींची कमाई करतायत हे 'धुरंधर' कॉमेडियन्स, संपत्तीचा आकडा ऐकून हैराण व्हाल!