TRENDING:

Rinku Rajguru : सिंगल नाही रिंकू राजगुरू! वॅलेंटाइनला खऱ्या आयुष्यातील परश्याबाबत आर्चीने सांगूनच टाकलं, कोण आहे तो?

Last Updated:
Rinku Rajguru Boyfriend : मी सिंगल, मी सिंगल म्हणणाऱ्या रिंकू राजगुरूने वॅलेनटाइन वीकमध्ये अखेर तिच्या रिलेशनशिपबाबत पहिल्यांदाच खरंखरं सांगितलं आहे.
advertisement
1/7
सिंगल नाही रिंकू राजगुरू! खऱ्या आयुष्यातील परश्याबाबत आर्चीने अखेर सांगूनच टाकलं
अभिनेत्री रिंकू राजगुरू जी सैराट फिल्ममधील तिचं पात्र आर्ची म्हणूनच ओळखली जाते. जिची परश्यासोबतची लव्हस्टोरी दाखवण्यात आली. पण या आर्चीचा खऱ्या आयुष्यातील परश्या कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना कायम राहिली आहे.
advertisement
2/7
रिंकूने वॅलेंटाइन डेला समुद्रकिनाऱ्यावर लाल साडीमध्ये तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. हातांचा हार्ट बनवला. तसंच ती अधूनमधून लाल गुलाबासोबतचे फोटोही शेअर करत असते. त्यामुळे रिंकूच्या आयुष्यात कुणी तरी आहे, अशी चर्चा होते.
advertisement
3/7
रिंकू राजगुरूने आजवर अनेक मुलाखती दिल्यात. ज्यात तिला तिच्या रिलेशनशिपबाबत विचारण्यात आलं. तेव्हा तिने आपलं असं काही नाही, आपण सिंगल आहोत असंच ती सतत सांगत राहिली. पण आता पहिल्यांदाच तिने खरं सांगितलं आहे.
advertisement
4/7
'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत रिंकू म्हणाली, "आपली लव्ह स्टोरी असावी, आपला राजकुमार असावा असं वाटतं. माझा प्रेमावर प्रचंड विश्वास आहे, प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे"
advertisement
5/7
तिला कुणी आवडत होतं का असं विचारलं तेव्हा तिने तिच्या खऱ्या आयुष्यातही परश्या होता, याची कबुली तिने दिली आहे. "आवडणं एक असतं, कधीतरी-कुणीतरी आवडलं ते होऊन गेलं आहे. मला कधीच कुणी आवडलं नाही असं नाही. आवडलं होतं, पण आता कुणी नाही. आता आमचे रस्ते स्वत:साठी मोकळे आहेत. आता मी खरंच सिंगल आहे", असं ती म्हणाली.
advertisement
6/7
"केलं तर आरपार प्रेम, पण तुही नाही सोडायचं, एकमेकांची जबाबदारी घ्यायची ताकद असेल तर या. जो मला म्हणेल तू मरेपर्यंत माझी बायको, तर मी त्याच्यासोबत राहिन. पण रिलेशनशिपची, प्रेमाची मला आता भीती वाटते", असं तिने सांगितलं.
advertisement
7/7
म्हणजे रिंकू राजगुरू कुणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये होती, पण तिचं ब्रेकअप झालं आहे, हे समोर आलं आहे. पण तो कोण होता? याबाबत मात्र तिने काही सांगितलं नाही
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : सिंगल नाही रिंकू राजगुरू! वॅलेंटाइनला खऱ्या आयुष्यातील परश्याबाबत आर्चीने सांगूनच टाकलं, कोण आहे तो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल