ज्या भूमिकेसाठी रिंकूनं घेतलं लाखोंचं मानधन, त्या आशा सेविकांना किती मिळतो पगार, आकडा वाचून शॉक व्हाल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Asha Workers Salary : अभिनेत्री रिंकू राजगुरूचा आगामी आशा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. आशा सेविकांवर आधारित हा सिनेमा असून या सिनेमाच्या माध्यमातून आशा सेविकांचे प्रश्न पुन्हा जगासमोर येणार आहे. आशा सेविकांना किती पगार मिळतो माहितीये?
advertisement
1/9

रिंकू राजगुरूचा बहुप्रतिक्षित 'आशा' हा सिनेमा 19 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सिनेमात रिंकूने आशा सेविकेची भूमिका साकारली आहे आणि तिचा हा नवा अंदाज प्रेक्षकांना आवडला आहे.
advertisement
2/9
ट्रेलरमध्ये रिंकू एका खऱ्या आशा कार्यकर्तीप्रमाणे घराघरांत जाऊन तपासण्या करताना, लोकांच्या समस्या समजून घेताना आणि शासकीय योजनांची माहिती देताना दिसते. गावागावांमध्ये आरोग्यसेवेची जबाबदारी सांभाळणाऱ्या आशा सेविकांचे आयुष्य किती कठीण असते, हे ट्रेलरमधून स्पष्टपणे जाणवतं.
advertisement
3/9
रिंकूने या भूमिकेसाठी लाखो रुपयांचं मानधन घेतलं असेल. पण ज्या खऱ्या आयुष्यात ही सेवा बजावतात त्या आशा सेविकांना दरमहा किती पगार मिळतो माहितीये? आशा सेविकांना मिळणाऱ्या पगाराचा आकडा वाचलात शॉक व्हाल.
advertisement
4/9
आशा ( ASHA ) म्हणजेच मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते ( Accredited Social Health Activist ) ही भारत सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) अंतर्गत नियुक्त केलेली ग्रामीण आरोग्य कार्यकर्ती आहे. गाव पातळीवर सामान्य नागरिक आणि आरोग्य व्यवस्था यांच्यातील दुवा म्हणून त्या काम करतात.
advertisement
5/9
गर्भवती महिलांची काळजी, तपासणी आणि हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी मदत, नवजात बाळांची देखरेख आणि लसीकरणाची माहिती देणे, आजारांविषयी जागरूकता निर्माण करणे, शौचालय, स्वच्छता, स्वच्छ पाणी यांसंबंधी मार्गदर्शन, सरकारी आरोग्य योजनेचे लाभ लोकांपर्यंत पोहोचवणे अशी अनेक या आशा सेविका करतात.
advertisement
6/9
रिंकूचा ‘आशा’ हा सिनेमा या आशा कार्यकर्त्यांच्या संघर्षावर प्रकाश टाकणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे
advertisement
7/9
आशा सेविकांना दरमहिला केवळ 3,000 ते 7,000 रुपयांपर्यंत पगार मिळतो. प्रत्येक राज्यानुसार आशा सेविकांचे पगार वेगवेगळे आहेत. आशा सेविकांचे इतके कमी पगार हे वास्तव अनेकांना धक्का देणारं आहे. या तुलनेत आशा त्यांची जबाबदारी, मेहनत आणि जोखीम अनेकपटीने जास्त असते.
advertisement
8/9
आशा सेविका या भारताच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा मानल्या जातात. विशेषतः ग्रामीण भागात त्या पहिला वैद्यकीय संपर्कबिंदू असतात. त्यांच्यामुळे अनेक महिलांना, बालकांना आणि सामान्य नागरिकांना वेळेवर उपचार मिळतात.
advertisement
9/9
रिंकूचा ‘आशा’ हा सिनेमा या आशा कार्यकर्त्यांच्या संघर्षावर प्रकाश टाकणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. रिंकूचा आशा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाल करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ज्या भूमिकेसाठी रिंकूनं घेतलं लाखोंचं मानधन, त्या आशा सेविकांना किती मिळतो पगार, आकडा वाचून शॉक व्हाल