पोलिसांनी सुपडसिंग रामचंद जोनवाल (45, रा. लांडकवाडी) याला अटक केली असून संबंधित जमावावरही गुन्हे नोंदवले आहेत, अशी माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात शेतमालामध्ये लपवून गांजाचे पीक घेतले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 3 डिसेंबरच्या रात्री गट क्रमांक 109 मध्ये संशयित ठिकाणी कारवाई करण्यात आली. पोलिस पथक आल्याचे लक्षात येताच जमिनीचा मालक व त्याचे सहकारी सतर्क झाले. प्राथमिक चौकशीदरम्यानच अंधाराचा फायदा घेत काही जणांनी जमाव गोळा केला आणि अचानक पोलिसांवर चाल करून दगडफेक सुरू केली.
advertisement
कामाचा ताण आणि 'बेडरुम सिक्रेट'ची देवाण घेवाण, डॉक्टर, गुरुजी हे बरं नव्हं! धक्कादायक प्रकरणं समोर
दगडफेकीत दोन-तीन पोलीस जखमी झाले असून पथकाने क्षणभर माघार घेतली. हीच वेळ साधून काही संशयितांनी गांजाचे रोपे उपटून तेथून गायब केली. नंतर अतिरिक्त फोर्स दाखल झाल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली. परिसराची पाहणी केली असता एकूण 15 गांजाची झाडे ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. जोनवाल याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ग्रामीण भागातील काही व्यक्ती अल्पावधीत चांगला आर्थिक फायदा मिळतो या मोहात अवैध गांजाच्या शेतीकडे वळत आहेत. ठराविक कालावधीनंतर तस्कर रोपे उचलून नेतात, यासाठी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम दिली जाते, असा प्रकार अनेक ठिकाणी उघड होत आहे.
अगोदरच्या मोठ्या कारवाया
30 ऑगस्ट : गेवराई बुद्रुक परिसरात 30 किलो गांजा जप्त.
ऑक्टोबर : तूर व कपाशीमधील 12 किलो गांजाचे रोपे जप्त.
सप्टेंबर : फुलंब्री तालुक्यातील बौधेगाचव परिसरात 116 गांजाची झाडे आढळली.
ऑक्टोबर : कन्नड तालुक्यात जैतखेडा शिवारात तुरीच्या आडोशात 15 लाखांचा, सुमारे दीडशे किलो गांजा जप्त.
11 महिन्यांपूर्वी : नागुणीची वाडी येथे 42 लाखांचा साठा उघड.
2024, खुलताबाद : तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचे गांजाचे पीक आढळून पोलिसही थक्क.
जिल्ह्यात वाढत्या अवैध शेतीबाबत पोलिसांनी पुन्हा सतर्कतेचा इशारा दिला असून अशा कारवायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.






