Genzee असूनही मॉर्डन रिलेशनशिप नको, रिंकूने सांगितली प्रेमाबद्दलची तिची व्याख्या
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतंच एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील 'सैयारा मूव्हमेंट' सांगितली आहे. तसेच मॉर्डन डेटिंगबाबतही तिने भाष्य केलं आहे.
advertisement
1/7

अहान पांडे आणि अनीत पड्डा अभिनीत 'सैयारा' ही रोमँटिक फिल्म 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिवर दणदणीत कमाई केली. ओटीटीवरही या सिनेमाने धमाका केला. 'सैयारा' या शब्दाचा अर्थ म्हणजे स्वत:च्या तेजस्वी अस्तित्वासोबत पुढे जाणं. नुकतंच एका मुलाखतीत रिंकू राजगुरूने आपल्या आयुष्यातील 'सैयारा' मूव्हमेंटबद्दल भाष्य केलं आहे.
advertisement
2/7
लोकमत फिल्मीने रिंकूला तिने आपल्या आयुष्यात दडवून ठेवलेली प्रेमाबद्दलची एक गोष्ट किंवा 'सैयारा' मूव्हमेंट कोणती? याबाबत प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत रिंकू म्हणाली,"माझ्या आयुष्यात येणारं प्रेम हे फक्त माझं असावं, ती सैयारा मूव्हमेंट आयुष्यभरासाठी माझी असावी, असं मला वाटतं".
advertisement
3/7
मॉर्डन डेटिंगबाबत बोलताना रिंकू राजगुरू म्हणाली,"मॉर्डन डेटिंग हा प्रकार मला वैयक्तिकरित्या आवडत नाही. कोणत्याही व्यक्तीसोबत तुम्ही नात्यात येता तेव्हा ट्राय करू आणि चार महिने राहुन बघु असं नाही करू शकत. कारण आपण भावनिकरित्या समोरच्या व्यक्तीमध्ये गुंतत असतो".
advertisement
4/7
मॉर्डन डेटिंगबाबत बोलताना रिंकू म्हणाली,"जर तुम्ही समोरच्या व्यक्तीची आयुष्यभर जबाबदारी घेणार असाल तरच त्या माणसाकडे जा. तुमची जर ती पात्रता नसेल तर तुम्ही त्याच्यात पडूच नका. सगळ्या गोष्टींसाठी अगोदरपासूनच क्लिअर राहा".
advertisement
5/7
रिंकू राजगुरूने काही दिवसांपूर्वी लग्न कधी करणार? याबाबत भाष्य केलं होतं. रिंकू म्हणालेली,"मी अद्याप माझा जोडीदार म्हणून कोणी शोधला नाही किंवा जी ज्याच्यासोबत लग्न करेल असा मला अजून कोणी तसा मिळाला नाही".
advertisement
6/7
रिंकू राजगुरूच्या लग्नाबाबत अनेकदा चर्चा होत असते. लग्न कधी करणार असा प्रश्न अनेकदा तिला विचारण्यात येतो. रिंकू राजगुरूचा होणारा जोडीदार कोण? हे जाणून घेण्याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे.
advertisement
7/7
रिंकू राजगुरू 'सैराट' या चित्रपटाच्या माध्यमातून घरघरांत पोहोचली. या चित्रपटात तिने साकारलेली आर्चीला संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं. आता रिंकू राजगुरूचा 'आशा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात रिंकूने आशा सेविकाची भूमिका साकारली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Genzee असूनही मॉर्डन रिलेशनशिप नको, रिंकूने सांगितली प्रेमाबद्दलची तिची व्याख्या