चकल्या, रांगोळी अन् दिवे; स्वत:ला टिपिकल बाई म्हणवणाऱ्या रिंकूने दिवाळीत काय काय केलं पाहा, PHOTO
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर खास दिवाळी स्पेशल व्हिडीओ शेअर केला आहे. रिंकूचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
advertisement
1/7

'सैराट' फेम रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर खास दिवाळी स्पेशल व्हिडीओ शेअर केला आहे. आर्चीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
advertisement
2/7
रिंकू राजगुरूने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मी टिपिकल बाईसारखी आहे, असं विधान केलं होता. अशातच अभिनेत्रीने आता शेअर केलेला हा व्हिडीओ त्या विधानाचा पुरावा आहे.
advertisement
3/7
रिंकू राजगुरू या व्हिडीओमध्ये पिठ मळताना, चकल्या करताना, रांगोळी काढताना, दिवे लावताना, मांजरीसोबत खेळताना दिसत आहे.
advertisement
4/7
रिंकूने व्हिडीओ शेअर करत बॅकग्राऊंडला 'दिन दिन दिवाळी' आणि 'उठा उठा दिवाळी आली' हे गाणं लावलं आहे.
advertisement
5/7
व्हिडीओ शेअर करत रिंकूने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा, असं कॅप्शन तिने दिलं आहे.
advertisement
6/7
रिंकूच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. चाहतेदेखील त्यांच्या लाडक्या अभिनेत्रीला दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत.
advertisement
7/7
रिंकू राजगुरूचा आगामी 'आशा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
चकल्या, रांगोळी अन् दिवे; स्वत:ला टिपिकल बाई म्हणवणाऱ्या रिंकूने दिवाळीत काय काय केलं पाहा, PHOTO