Guess Who : ऋषी कपूरसोबत ब्लॉकबस्टर देणारी ही मराठी अभिनेत्री राज कपूरची होती फेव्हरेट, ओळखलं का?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actress : 80 च्या दशकातील एका अभिनेत्रीने आपल्या कारकिर्दीत राजेश खन्नापासून ते ऋषी कपूरपर्यंत प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केलं आणि मोठं नाव कमावलं आहे.
advertisement
1/7

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी बालकलाकार म्हणून आपला करिअरची सुरुवात केली. पद्मिनी कोल्हापुरे या त्या स्टार्सपैकी एक आहेत. 80 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेल्या पद्मिनी कोल्हापुरे यांनी अत्यंत लहान वयात काम करण्यास सुरुवात केली आणि पुढे जाऊन इंडस्ट्रीतील यशस्वी नायिका बनल्या.
advertisement
2/7
पद्मिनी कोल्हापुरे यांनी आपल्या कारकिर्दीत ऋषी कपूर, मिथुन चक्रवर्तीपासून ते राजेश खन्ना यांसारख्या स्टार्ससोबत काम केलं आणि पाहता पाहता इंडस्ट्रीतील मोठं नाव कमावलं. पद्मिनी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1972 मध्ये ‘इश्क इश्क इश्क’ या चित्रपटाच्या माध्यमातून केली होती. पण त्यांना खरी ओळख 'सत्यम शिवम' या 1978 मध्ये आलेल्या चित्रपटाच्या माध्यमातून मिळाली. या चित्रपटात त्यांनी जीनत अमानच्या लहानपणीचं पात्र साकारलं होतं.
advertisement
3/7
पद्मिनी कोल्हापुरे यांनी 1972 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. पद्मिनी यांनी ऋषी कपूरसोबत आपल्या करिअरचा सर्वात मोठा हिट चित्रपट दिला. 'प्रेमरोग' असं या चित्रपटाचं नाव होतं. या चित्रपटात त्यांनी एका विधवा मुलीची भूमिका साकारली आणि आपल्या निरागसतेने प्रेक्षकांना फक्त प्रभावितच केले नाही तर रडायला देखील लावले.
advertisement
4/7
'प्रेमरोग' या चित्रपटानंतर पद्मिनी रातोरात स्टार बनल्या आणि त्यानंतर राज कपूरच्या अनेक चित्रपटांत दिसल्या, ज्यामुळे त्यांना राज कपूरची फेव्हरेट नायिका म्हटले जाऊ लागले. पण, आपल्या बोल्ड कंटेंटसाठी प्रसिद्ध असलेले राज कपूर कधीच पद्मिनीकडून ऑन-स्क्रीन बोल्ड सीन करवू शकले नाहीत.
advertisement
5/7
पद्मिनी कोल्हापुरे यांनी आपल्या कारकिर्दीत बॉलिवूडच्या अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले. यामध्ये ऋषी कपूरपासून ते राजेश खन्ना यांसारख्या स्टार्सचा समावेश आहे. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यांनी कधीही अमिताभ बच्चनसोबत काम केले नाही. एका मुलाखतीत पद्मिनी म्हणाल्या होत्या,"मला नेहमीच हे वाईट वाटायचं की मी कधी अमिताभ बच्चनसोबत काम करू शकले नाही. नेहमी वाटायचं की एकदा तरी त्यांच्यासोबत काम करायला पाहिजे होतं."
advertisement
6/7
पद्मिनी कोल्हापुरे आणि श्रद्धा कपूरचीदेखील चांगली मैत्री होती. प्रत्यक्षात पद्मिनीची बहिण शिवांगी कोल्हापुरे या बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक शक्ति कपूर यांच्या पत्नी आणि श्रद्धा कपूरच्या आई आहेत. म्हणजे शक्ति कपूर हे पद्मिनीचे जावई आणि श्रद्धा ही पद्मिनीची भाची आहे आणि आज श्रद्धा बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.
advertisement
7/7
श्रद्धाने आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ज्यामध्ये आशिकी 2, स्त्री, तू झूठी मी मक्कार आणि 2024 मध्ये प्रदर्शित झालेला ‘स्त्री 2’ या चित्रपटांचा समावेश आहे. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या स्त्री 2 ने बॉक्स ऑफिसवर जगभरात 880 कोटींची कमाई केली. 55 ते 60 कोटींच्या आसपास बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who : ऋषी कपूरसोबत ब्लॉकबस्टर देणारी ही मराठी अभिनेत्री राज कपूरची होती फेव्हरेट, ओळखलं का?