Pickle Health : लोणचं ठरू शकतो ‘विष; खाण्यापूर्वी 'या' 3 गोष्टी लक्षात ठेवा, डॉक्टरांचा इशारा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
लोणचं केवळ चव वाढवत नाही, तर जेवणाला एकदम झणझणीत टच देतो. पण तुम्हाला माहिती आहे का, हेच लोणचंकधी कधी शरीरासाठी विषासारखाही ठरू शकतो?
advertisement
1/8

भारतीय जेवणाची थाळी म्हणजे फक्त भाजी, भात किंवा चपाती नव्हे, तर या थाळीला किंवा ताटाला संपूर्ण करतं एक चमचा लोणचं. जेवण कितीही साधं असलं तरी बाजूला आंबट-तिखट असं लोणचं नसेल तर थाळी अपूर्णच वाटते. लोणचं केवळ चव वाढवत नाही, तर जेवणाला एकदम झणझणीत टच देतो. पण तुम्हाला माहिती आहे का, हेच लोणचंकधी कधी शरीरासाठी विषासारखाही ठरू शकतो?
advertisement
2/8
असंच एक धक्कादायक उदाहरण हेल्थ एक्सपर्ट डॉ. अदितिज धमीजा यांनी शेअर केलं आहे. त्यांनी सांगितलं की चुकीच्या पद्धतीने साठवलेलं लोणचं खाल्ल्याने एका संपूर्ण कुटुंबाला आयसीयूमध्ये दाखल करावं लागलं. डॉ. धमीजांच्या मते, लोणचं योग्य रीतीने प्रिझर्व न केल्यास त्यात घातक बॅक्टेरिया वाढू शकतात आणि ते गंभीर आजारांनाही कारणीभूत ठरू शकतात.
advertisement
3/8
लोणचं विषासारखा का ठरतो?डॉ. धमीजा सांगतात की जर लोणचं नीट प्रिझर्व्ह नसेल केला, तर त्यामध्ये ‘बोटुलिझम’ नावाचा जीवाणू वाढतो. हा जीवाणू टॉक्सिन्स (विषारी द्रव्ये) तयार करतो, जे शरीरात गेल्यास पॅरालिसिस (अंग सुन्न होणे) सारखा गंभीर आजार होऊ शकतो. काही वेळा हे जीवघेणंही ठरू शकतं. त्यामुळे लोणचं बनवताना आणि साठवताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं अत्यावश्यक आहे.
advertisement
4/8
नेहमी स्वच्छ बरण्यांचा वापर करालोणचं साठवताना स्वच्छ आणि स्टेरिलाइज्ड काचेच्या बरण्यांचा वापर करा.काचेची बरणी सर्वोत्तम असते कारण प्लास्टिकमध्ये केमिकल रिस्क असतो आणि मेटलच्या डब्यात रिऍक्शन होण्याची शक्यता असते.बरणी वापरण्यापूर्वी गरम पाण्याने धुवा आणि पूर्णपणे कोरडी होऊ द्या.असं केल्याने बॅक्टेरिया किंवा फंगस वाढण्याचा धोका कमी होतो.
advertisement
5/8
डॉ. धमीजांच्या मते, लोणच्यामधील तेल आणि व्हिनेगर (सिरका) हे नैसर्गिक प्रिझर्व्हेटिव्ह असतात. पण त्यांचं प्रमाण कमी असेल, तर अचारमध्ये बॅक्टेरिया वाढतात.
advertisement
6/8
नेहमी तेलाची पातळी वरपर्यंत राहतेय का हे तपासा.वरचा भाग कोरडा राहिला, तर फंगस लागण्याचा धोका वाढतो.म्हणून नियमितपणे लोणचं पाहत राहा आणि आवश्यक असल्यास तेल किंवा व्हिनेगर वाढवा.
advertisement
7/8
हे लक्षण दिसले तर लोणचं लगेच फेकून द्याजर अचारमध्ये खालील बदल दिसले, तर तो त्वरित फेकून द्यालोणच्याचा रंग अचानक बदलणेविचित्र वास येणेबरणीत बुडबुडे (गॅस) दिसणेअशा कोणत्याही चिन्हांकित बदलांकडे दुर्लक्ष केल्यास ते आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.
advertisement
8/8
लोणचं ही भारतीय जेवणातील चविष्ट परंपरा आहे, पण थोडासा निष्काळजीपणा तुमच्या आरोग्याशी खेळ करू शकते. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही लोणचं बनवा किंवा बाजारातून आणा, तेव्हा स्वच्छता, योग्य साठवण आणि प्रमाणबद्ध तेल-व्हिनेगरचा वापर या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Pickle Health : लोणचं ठरू शकतो ‘विष; खाण्यापूर्वी 'या' 3 गोष्टी लक्षात ठेवा, डॉक्टरांचा इशारा