Riteish-Genelia Deshmukh : रितेश-जेनिलिया पुन्हा लावणार 'वेड'! या दिवशी नवीन फिल्म, पहिला लुक समोर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
'वेड' या ब्लॉकबस्टर सिनेमानंतर रितेश आणि जेनिलिया देशमुख पुन्हा एकत्र मोठ्या स्क्रिनवर दिसणार आहे. त्यांचा सिनेमा या दिवशी रिलीज होणार आहे.
advertisement
1/10

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडत्या जोड्यांपैकी एक असलेली रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख. ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.
advertisement
2/10
रितेश आणि जेनिलिया यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे. 'वेड' सिनेमानंतर आता तीन वर्षांनी ही जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
advertisement
3/10
रितेश आणि जेनिलिया यांची लव्हस्टोरी 'तुझे मेरी कसम' या सिनेमापासून सुरू झाली. हा दोघांचाही डेब्यू सिनेमा होता. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानच त्यांच्या नात्याला सुरुवात झाली आणि काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी लग्न केलं.
advertisement
4/10
लग्नानंतर मात्र दोघे एकत्र मोठ्या पडद्यावर दिसले नाहीत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना या जोडीला पुन्हा पाहण्याची उत्सुकता कायम होती.
advertisement
5/10
20 वर्षांनंतर 2022 साली 'वेड' या मराठी सिनेमातून ही जोडी पुन्हा एकत्र आली. या सिनेमाचं दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुखनं केलं होतं. या सिनेमात दोघांनी नवरा-बायकोची भूमिका साकारली होती.
advertisement
6/10
'वेड' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. या सिनेमाने तब्बल 75.50 कोटींची कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला. हा सिनेमा मराठीतील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला.
advertisement
7/10
'वेड'नंतर आता तीन वर्षांनी रितेश आणि जेनिलिया पुन्हा एकत्र दिसणार आहेत. 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक सिनेमातून ही जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे.
advertisement
8/10
या सिनेमात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर जेनिलिया देशमुख त्यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला असून पहिला लुकही समोर आला आहे.
advertisement
9/10
रितेशचा दमदार आणि प्रभावी लुक पाहून प्रेक्षकांमध्ये सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'रितेश आहे म्हणजे वहिनी देखील आलीच' अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
advertisement
10/10
'राजा शिवाजी' हा बहुप्रतिक्षित सिनेमा 1 मे रोजी रिलीज होणार आहे. ऐतिहासिक विषय, दमदार कलाकार आणि रितेश-जेनिलियाची जोडी यामुळे या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. 'वेड'नंतर पुन्हा एकदा ही जोडी काय कमाल करते हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Riteish-Genelia Deshmukh : रितेश-जेनिलिया पुन्हा लावणार 'वेड'! या दिवशी नवीन फिल्म, पहिला लुक समोर