Rohit Arya Encounter: रोहितने ज्या स्टुडिओत मुलांना ठेवलं ओलीस, त्याच studio मध्ये आले होते मराठी सेलिब्रिटी, PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
मागील ६ दिवसांपासून १०० विद्यार्थ्यांचं इथं ऑडिशन घेण्यात आलं. यावेळी मराठी आणि हिंदीतील कलाकार मंडळी सुद्धा या रा स्टुडिओमध्ये येऊन गेली होती.
advertisement
1/6

एखाद्या सिनेमाला लाजवेल अशी घटना मुंबईतील पवई परिसरात घडली. सरकारकडे पैसे थकल्यामुळे रोहित आर्या नावाच्या तरुणाने 17 विद्यार्थ्यांना ओलीस ठेवलं होतं. मात्र, पोलिसांनी धडक कारवाई करत रोहित आर्या या तरुणाचा एन्काउंटर केला. पण ज्या स्टुडिओमध्ये ही घटना घडली, त्या स्टुडिओमध्ये ६ दिवसांमध्ये अनेक सेलिब्रिटी येऊन गेले होते.
advertisement
2/6
पवईतील महावीर क्लासिक नावाची इमारत आहे, या इमारतीत रा नावाचा स्टुडिओ आहे. या स्टुडिओमध्ये रोहित आर्याने १७ जणांना बंदी ठेवलं होतं. या ठिकाणी सगळ्यांना वेब सीरिजच्या ऑडिशनसाठी आणलं असल्याची माहिती दिली होती.
advertisement
3/6
मागील ६ दिवसांपासून १०० विद्यार्थ्यांचं इथं ऑडिशन घेण्यात आलं. यावेळी मराठी आणि हिंदीतील कलाकार मंडळी सुद्धा या रा स्टुडिओमध्ये येऊन गेली होती. त्यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत फोटो सुद्धा काढले होते.
advertisement
4/6
यावेळी या रा स्टुडिओमध्ये अभिनेते गिरीश ओक सुद्धा आले होते. त्यावेळी ऑडिशनला आलेल्या मुलांनी त्यांच्यासोबत फोटो काढला होता.
advertisement
5/6
एका फोटोमध्ये अभिनेत्री उर्मिला कोठारे सुद्धा दिसत आहे. हा फोटो रा स्टुडिओमधलाच आहे. यावेळी लहान मुलांनी त्यांच्यासोबत हा फोटो काढला होता.
advertisement
6/6
या स्टुडिओमध्ये प्रोडक्शन हेड रोहन आहेर आहे, तो सुद्धा या फोटोमध्ये इतर सेलिब्रिटींसोबत दिसत आहे. रोहन आहेर याने स्टुडिओची काच तोडून मुलांना वाचवण्यास मदत केली होती. रोहन हा एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचा मित्र असल्याचंही समोर आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rohit Arya Encounter: रोहितने ज्या स्टुडिओत मुलांना ठेवलं ओलीस, त्याच studio मध्ये आले होते मराठी सेलिब्रिटी, PHOTOS