TRENDING:

चला हवा येऊ द्या अर्ध्यात सोडलं, 2 वर्ष TV पासून दूर; सागर कारंडे करणार Bigg Boss Marathi 6 एन्ट्री?

Last Updated:
बिग बॉस मराठी 6 ची सर्वत्र चर्चा आहेत. बिग बॉसच्या घरात कोण जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. अभिनेता सागर कारंडे बिग बॉसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.
advertisement
1/9
CHYD अर्ध्यात सोडलं, 2 वर्ष TV पासून दूर; सागर कारंडेची BBM6मध्ये एन्ट्री?
सध्या सर्वत्र बिग बॉस मराठी सीझन 6 ची चर्चा आहे. येत्या 11 जानेवारीपासून बिग बॉस मराठी सीझन 6 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. दरम्यान या सीझनमध्ये कोणते स्पर्धक दिसणार याची उत्सुकचा प्रेक्षकांमध्ये आहे.
advertisement
2/9
अनेक कलाकारांनी नावं बिग बॉस मराठी 6 साठी समोर येत आहेत. प्रेक्षकांनीही अनेक कलाकारांची नाव घेतली आहेत. अशातच प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडे बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. सागर कारंडेनं केलेली एक पोस्ट या चर्चेचं कारण ठरली आहे.
advertisement
3/9
सागर कारंडेनं 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. या शोमध्ये तो साकारत असलेलं स्त्री पात्र चांगलंच लोकप्रिय झालं. त्यानं साकारलेली पोस्टमनची भूमिका देखील खूप प्रसिद्ध झाली.
advertisement
4/9
दरम्यान 'चला हवा येऊ द्या' हा शो संपल्यानंतर सागर कारंडे फार कुठेच दिसला नाही. सध्या त्याचं 'हिच तर फॅमिलीची गंमत आहे' हे नाटक सुरू आहे. चला हवा येऊ द्या सोडल्यानंतर त्याने यापुढे स्त्री पात्र करणार नसल्याचं सांगितलं होतं. 
advertisement
5/9
काही महिन्यांआधीच एका सायबर फ्रॉडमध्ये सागर कारंडेचं नाव आलं होतं. सायबर फ्रॉडमध्ये सागर कारंडेची लाखे रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र सागर कारंडेनं यावर प्रतिक्रिया देत या अफवा असल्याचं सांगितलं होतं.
advertisement
6/9
दरम्यान सागर कारंडे मागील काही वर्ष मालिका, नाटक किंवा सिनेमा तसंच टेलिव्हिजनवर दिसत नाहीये. तो सध्या करतो काय असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. दरम्यान तो बिग बॉस मराठी 6 मध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
advertisement
7/9
सागर कारंडेनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिलंय, "गंमत झाली आता *** जमंत होणार. लवकरच तुमच्या भेटीला 2026."
advertisement
8/9
सागर कारंडेच्या या पोस्टमध्ये तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हे तर स्पष्ट झालं आहे. मात्र तो कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटणार आहे हे समजलेलं नाही. त्यामुळे चाहत्यांनी तो बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये दिसणार असल्याचा अंदाज लावला आहे.
advertisement
9/9
या पोस्टवर काहींनी त्याला नवीन नाटक येत आहे का? बिग बॉस मराठी 6 मध्ये जाणार का? असे प्रश्न विचारले आहेत. आता सागर कारंडे नेमका कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हे पाहणं त्याच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेचं ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
चला हवा येऊ द्या अर्ध्यात सोडलं, 2 वर्ष TV पासून दूर; सागर कारंडे करणार Bigg Boss Marathi 6 एन्ट्री?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल