फॅनने जोरात मारली हाक, पण रिंकू राजगुरूने केलं इग्नोर, ती असं का वागली?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Rinku Rajguru : रिंकू राजगुरू अभिनीत 'आशा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान आर्ची म्हणून हाक मारताच रिंकू राजगुरू चाहतीला इग्नोर करताना दिसून आली आहे.
advertisement
1/8

रिंकू राजगुरू अभिनीत 'आशा' हा बहुचर्चित चित्रपट 19 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात रिंकू पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात रिंकू 'आशा सेविका'ची भूमिका साकारताना दिसणार आहे.
advertisement
2/8
रिंकू राजगुरू 'सैराट'च्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचली. तिने साकारलेल्या आर्ची या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. 'सैराट'मधील तिचा अभिनय, डायलॉग अशा सर्व गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. सैराटनंतर रिंकू संपूर्ण महाराष्ट्रभर 'आर्ची'म्हणून ओळखली जाऊ लागली.
advertisement
3/8
रिंकू राजगुरू 'सैराट'च्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचली. तिने साकारलेल्या आर्ची या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. 'सैराट'मधील तिचा अभिनय, डायलॉग अशा सर्व गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. सैराटनंतर रिंकू संपूर्ण महाराष्ट्रभर 'आर्ची'म्हणून ओळखली जाऊ लागली.
advertisement
4/8
'सैराट'नंतर रिंकूला आर्ची म्हणून ओळख मिळाली. तिलाही त्याची सवय झाली होती. आता 'आशा' या चित्रपटात रिंकू आशा सेविंकाच्या जीवनातील संघर्ष, वेदना आणि तळमळ दाखवताना दिसणार आहे. रिंकू 'आशा' नावाच्या आरोग्य सेविकेची भूमिका साकारत आहे. जी सायकलवरुन गावागावात जाऊन लोकांपर्यंत पोहोचते.
advertisement
5/8
'आशा' साकारत असताना रिंकू राजगुरूची जी इमेज अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्या इमेजच्या पहिकडे जाऊन तिला आपल्याला 'आशा' म्हणून ओळखणं, 'मालती' म्हणून ओळखणं खूप गरजेचं होतं.
advertisement
6/8
रिंकू 'आशा' हे पात्र साकरल्याबद्दलचा एक किस्सा एबीपीसोबत शेअर करत सांगते,"आशा या चित्रपटाबद्दल रिलीजआधीपासूनच आम्हाला खूप छान कमेंट्स येत आहेत.'सैराट'नंतर मला आर्ची ताई या एकाच आवाजाची सवय होती. मागे नागपुरला गेले असताना कोणीतही मला आशा ताई म्हणून पहिल्यांदा आवाज दिला आणि सुरुवातीला मला कळलं नाही आणि मी त्या आवाजाकडे दुर्लुक्ष केलं. नंतर त्या मला म्हणाल्या,"आम्ही तुमचा टीझर पाहिला बरं का? आम्ही फिल्म पण पाहायला जाणार आहोत.
advertisement
7/8
रिंकू पुढे म्हणाली,"पुण्यात पत्रकार परिषदेदरम्यान मला मालतीचा डायलॉग म्हणायला लावला. त्यामुळे मला वाटतं आशा ताई लोकांना जवळची वाटत आहे. त्या सगळ्यांना आपल्याशा वाटत आहेत आणि आता ही भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. दिग्दर्शकाने सांगितलं तसं काम मी करत गेले आहे. त्यामुळे लोकांना मी मी साकारलेली आशा ताई नक्कीच आपलीशी वाटेल.
advertisement
8/8
महिलांच्या संघर्षांचा, त्यांच्या जिद्दीचा आणि समाजाशी सुरू असलेल्या लढ्यांचा संवेदनशील आणि वास्तववादी प्रवास रिंकू राजगुरूच्या ‘आशा’मधून उलगडला जाणार आहे. सामाजिक वास्तव, महिलांवर येणारे अनेक कठोर निर्णय, भावनिक दडपण आणि अस्मितेची लढाई या सगळ्यांचा प्रभावी संगम चित्रपटात दिसणार आहे. ‘आशा’ ही केवळ एका सेविकेची कथा नाही, तर सर्व स्तरांवर दररोज लढणाऱ्या लाखो महिलांची कहाणी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
फॅनने जोरात मारली हाक, पण रिंकू राजगुरूने केलं इग्नोर, ती असं का वागली?