TRENDING:

10 महिन्यात शो सोडला, निर्मात्यांवर लैंगिक छळाचे आरोप, आता त्याच शोमध्ये शिल्पा शिंदेचं कमबॅक, म्हणते...

Last Updated:
Shilpa Shinde Comeback in Bhabhi Ji Ghar Par Hain: ज्या निर्मात्यांवर तिने लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप करून पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढल्या होत्या, त्याच शोमध्ये ती पुन्हा परतली आहे.
advertisement
1/7
शो सोडला, निर्मात्यांवर छळाचे आरोप, आता त्याच शोमध्ये शिल्पा शिंदेचं कमबॅक
मुंबई: टीव्ही विश्वात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे सर्वांची लाडकी 'अंगूरी भाभी' अर्थात शिल्पा शिंदे. १० वर्षांपूर्वी ज्या शोमधून शिल्पा अत्यंत वादग्रस्त पद्धतीने बाहेर पडली होती, ज्या निर्मात्यांवर तिने लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप करून पोलीस स्टेशनच्या पायऱ्या चढल्या होत्या, त्याच शोमध्ये ती पुन्हा परतली आहे.
advertisement
2/7
"एवढं महाभारत घडल्यानंतर पुन्हा तिथेच कसं?" असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. आता खुद्द शिल्पानेच यामागचं खरं कारण सांगत 'अंगूरी भाभी' स्टाईलने उत्तर दिलं आहे.
advertisement
3/7
शिल्पा शिंदेने एका मुलाखतीत आपल्या मनातील खदखद आणि आनंदाला वाट करून दिली. ती म्हणाली, "खरं सांगू तर, मी पुन्हा या शोचा भाग होईन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण म्हणतात ना, नशिबाचे खेळ अजब असतात. कुटुंबातही भांडणं होतात, तसंच काहीसं आमच्यात झालं होतं. वेळ सरली, गैरसमज दूर झाले आणि नाती पुन्हा जोडली गेली. मी नेहमी माझ्या हृदयाचं ऐकते, त्यामुळे एकदा 'हो' म्हटल्यावर मी 'ॲक्शन आणि रिॲक्शन'चा विचार केला नाही."
advertisement
4/7
२०१६ मध्ये जेव्हा शिल्पाने 'भाभीजी घर पर हैं' सोडलं होतं, तेव्हा टीव्ही इंडस्ट्री हादरली होती. शिल्पाने निर्मात्यांवर लैंगिक छळाचे आरोप केले होते, तर निर्मात्यांनी तिला अनप्रोफेशनल ठरवलं होतं.
advertisement
5/7
यावर बोलताना शिल्पा म्हणाली, "त्यावेळी आमच्यामध्ये एक थर्ड पार्टी शिरली होती. चॅनलच्या बाजूने काही लोकांनी चुकीच्या अफवा पसरवल्या होत्या. कराराच्या नावाखाली मला कैद करण्याचा प्रयत्न झाला. जेव्हा तुम्ही वर्षानुवर्षे मेहनत करून एक करिअर घडवता आणि त्याच पात्रावर प्रश्नचिन्ह उभे केले जातात, तेव्हा ते सहन करणं कठीण असतं."
advertisement
6/7
शिल्पाने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की, "आज जर त्याच सन्मानाने माझं स्वागत होत असेल, तर याचा अर्थ निर्मात्यांनाही माहीत होतं की मी चुकीची नव्हते. शो तर सुरूच होता, पण जुन्या आठवणी विसरून मला पुन्हा बोलावणं हीच माझ्यासाठी मोठी पावती आहे."
advertisement
7/7
शिल्पा गेल्यानंतर शुभांगी अत्रे हिने तब्बल १० वर्षे अंगूरी भाभीची जबाबदारी पेलली. याबद्दल शिल्पाने तिचं भरभरून कौतुक केलं. "शुभांगीने १० वर्षे हे पात्र जिवंत ठेवलं, हे सोपं काम नाही. एखादा डेली सोप इतका काळ टिकवून ठेवण्यासाठी खूप मेहनत लागते, तिला माझा सलाम!" असं शिल्पाने अगदी खिलाडूवृत्तीने सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
10 महिन्यात शो सोडला, निर्मात्यांवर लैंगिक छळाचे आरोप, आता त्याच शोमध्ये शिल्पा शिंदेचं कमबॅक, म्हणते...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल