TRENDING:

सलमान खानच्या बर्थडेचे खूप व्हिडीओ तुम्ही पाहिले ना? पण भाईजानची ही एक गोष्ट तुम्ही 100 टक्के मिस केली असेल

Last Updated:
सलमान खानने 60 वा बर्थडे पनवेल फार्महाऊसवर कुटुंब, एमएस धोनी, आदित्य रॉय कपूर, रकुल प्रीत सिंग, तब्बू यांच्या उपस्थितीत ग्रँड सेलिब्रेट केला. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल.
advertisement
1/10
सलमानच्या बर्थडेचे व्हिडीओ पाहिले?भाईजानची ही 1 गोष्ट तुम्ही 100 टक्के मिस केली
बॉलिवूडचा लाडका सुपरस्टार सलमान खान आज 27 डिसेंबर त्याचा 60 वा बर्थडे सेलिब्रेट करतोय.  दरवर्षीप्रमाणे त्याच्या पनवेल फार्महाऊसबाहेर चाहते आणि पापाराझींची मोठी गर्दी जमली होती.
advertisement
2/10
चाहत्यांवरचं प्रेम व्यक्त करत, भाईजान स्वतः फार्महाऊसबाहेर आला आणि तिथे सगळ्या पापाराझींसोबत केक कापला. सलमान खानच्या बर्थडेचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 
advertisement
3/10
सलमान खानचा बर्थडे हा नेहमीच ग्रँड नव्हता. तो त्याच्या अत्यंत जवळच्या माणसांसोबत सेलिब्रेट करतो. पण यंदा त्याचा 60 वा बर्थडे असल्याने तो खूप ग्रँड होणार आहे. बर्थडेच्या रात्री सलमानचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.
advertisement
4/10
आदित्य रॉय कपूर, रकुल प्रीत सिंग आणि हुमा कुरेशी यांच्यासह अनेक प्रमुख बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते. अरबाज खान त्याची पत्नी शौरा खानसोबत पोहोचला. त्याचा मुलगा अरहान देखील फार्महाऊसच्या बाहेर दिसला. बहीण अर्पिता खान देखील तिचा पती आयुष शर्मासोबत या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली.
advertisement
5/10
सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या ग्लॅमरमध्ये भर घालण्यासाठी तब्बू देखील आली. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी देखील त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासह सहभागी झाला. सलमानचे वडील सलीम खान आणि आई सलमा खान यांच्या उपस्थितीने या सेलिब्रेशनला खरोखरच कुटुंबासारखे वातावरण निर्माण झाले.
advertisement
6/10
मिळालेल्या माहितीनुसार,  27 डिसेंबर रोजी सलमान तान त्याच्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमासंबंधी मोठी घोषणा करणार आहे. सिनेमा टीझर रिलीज होण्याची शक्यता आहे. 
advertisement
7/10
सलमान खानच्या बर्थडे सेलिब्रेशनचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल आहेत. तुम्ही सगळे व्हिडीओ पाहिलेही असतील पण त्यात एक गोष्ट सलमान खानने केली आहे जी कोणाच्याच लक्षात आलेली नाही.
advertisement
8/10
वांद्रे वरळी सी लिंकवर सलमान खानचा फोटो लावण्यात आला आहे. सलमान खानची किती क्रेझ आहे हे यातून पाहायला मिळाला. सलमान खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.  
advertisement
9/10
सलमान खानची एक गोष्ट तुम्ही नक्कीच मिस केली. सलमान खान त्याच्या 60 व्या बर्खडेला यंद लुकमध्ये दिसला. सलमान खानने क्लिन शेव केली आहे.
advertisement
10/10
सलमान खानला क्लिन शेवमध्ये पाहून त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तरुणींना पुन्हा त्यांचा 90s वाला सलमान खान आठवला असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सलमान खानच्या बर्थडेचे खूप व्हिडीओ तुम्ही पाहिले ना? पण भाईजानची ही एक गोष्ट तुम्ही 100 टक्के मिस केली असेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल