TRENDING:

Guess Who: सलमान खानची पाकिस्तानी हिरोईन, पतीने सख्ख्या मेव्हणीसोबत मिळून आणलं रस्त्यावर, बरबाद झाली अभिनेत्री

Last Updated:
Salman Khan's Pakistani heroine: ही गोष्ट आहे सलमान खानसोबत दोन मोठे चित्रपट केलेल्या एका अभिनेत्रीची, जिची यश मिळाल्यानंतरही अतिशय वाईट अवस्था झाली.
advertisement
1/9
सलमान खानची पाकिस्तानी हिरोईन, पतीने सख्ख्या मेव्हणीसोबत मिळून आणलं रस्त्यावर
मुंबई: बॉलिवूडमध्ये काही कलाकारांना ब्लॉकबस्टर चित्रपट मिळूनही स्टारडमच्या शिखरावर पोहोचता येत नाही. ही गोष्ट आहे सलमान खानसोबत दोन मोठे चित्रपट केलेल्या एका अभिनेत्रीची, जिची यश मिळाल्यानंतरही अतिशय वाईट अवस्था झाली. ही अभिनेत्री आहे हुमा खान, जिच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही.
advertisement
2/9
हुमा खान यांचा जन्म पाकिस्तानात झाला, पण त्यांनी अभिनयाच्या जोरावर भारत आणि पाकिस्तानात नाव कमावले. त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
advertisement
3/9
१९८१ मध्ये 'आपस की बात' या हिंदी चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्या 'शराबी', 'आज का एम.एल.ए.' अशा अनेक चित्रपटांमध्ये दिसल्या.
advertisement
4/9
हुमा यांना खरी ओळख मिळाली ती सूरज बड़जात्यांच्या आयकॉनिक चित्रपट 'मैने प्यार किया' मुळे. यानंतर त्यांनी सलमान खानसोबत पुन्हा 'हम साथ साथ हैं' मध्येही काम केले. या दोन्ही चित्रपटांमध्ये त्यांची भूमिका छोटी असली तरी त्यांना ओळख मिळाली.
advertisement
5/9
१९९२ मध्ये शेजारी असलेल्या एका व्यक्तीशी लग्न केल्यानंतर हुमा खान यांनी अभिनयातून ब्रेक घेतला. अनेक स्वप्ने घेऊन संसार सुरू करणाऱ्या हुमा यांनी कधी विचारही केला नसेल की हा विवाह त्यांचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करेल.
advertisement
6/9
हुमा यांच्या पतीने त्यांना केवळ घटस्फोटच दिला नाही, तर त्यांच्या सख्ख्या बहिणीशी लग्न केले! पती आणि बहीण नायमा यांनी मिळून हुमा खान यांच्यावर मोठे षडयंत्र रचले. त्यांनी हुमा यांची सगळी आयुष्यभराची कमाई हडपली आणि त्यांना अक्षरशः रस्त्यावर आणले.
advertisement
7/9
आपले दिवस त्यांना हालाखीत काढावे लागले आणि उदरनिर्वाहासाठी लहान-सहान भूमिका कराव्या लागल्या. हुमा खान त्यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट परिस्थितीतून जात असताना सलमान खानने त्यांच्या मदतीसाठी हात पुढे केला.
advertisement
8/9
एका जुन्या मुलाखतीत हुमा यांनी स्वतः सांगितले होते की, करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील सर्वात वाईट काळात त्यांचे जुने मित्र सलमान खान यांनी त्यांना आर्थिक आणि कायदेशीर आधार दिला. कोर्ट केसदरम्यानही तो त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहिला.
advertisement
9/9
२०१२ मध्ये, हुमा खान यांच्या आयुष्याला आणखी एक धक्का बसला. त्यांच्यावर आपल्या मोलकरणीच्या १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला त्रास दिल्याचा आरोप होता. पुणे येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. वगवसे यांनी त्यांना तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who: सलमान खानची पाकिस्तानी हिरोईन, पतीने सख्ख्या मेव्हणीसोबत मिळून आणलं रस्त्यावर, बरबाद झाली अभिनेत्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल