TRENDING:

Samantha Prabhu Marriage : लाल साडी अन् हातावर मेहंदी, समांथा प्रभूने गुपचूप केलं दुसरं लग्न; फोटो आले समोर

Last Updated:
Samantha Prabhu Second Marriage Photo : अभिनेत्री समांथा दुसऱ्यांदा बोहल्यावर चढली. तिने बॉयफ्रेंड राजबरोबर गुपचूप लग्न केलं. समांथाच्या लग्नाचे पहिले फोटो नुकतेच तिने शेअर केलेत.
advertisement
1/7
लाल साडी अन् हातावर मेहंदी, समांथा प्रभूने गुपचूप केलं दुसरं लग्न; फोटो आले समोर
साऊथ अभिनेत्री आणि नॅशनल क्रश समांथा रुथ प्रभू हिने नुकतंच लग्न केलं आहे. द फॅमिली मॅनचा डायरेक्टर राज निदुमोरू याच्याबरोबर ती लग्नबंधनात अडकली आहे.
advertisement
2/7
अभिनेता नागा चैतन्यबरोबर डिवोर्स झाल्यानंतर जवळपास चार वर्षांची समांथाने तिचा दुसरा संसार थाटला आहे. कोणालाही न सांगता, अत्यंत जवळच्या व्यक्तींमध्ये समांथाने लग्न केलं.
advertisement
3/7
समांथाने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. लग्नाचे फोटो शेअर करत तिने वेडिंग 01.12.2025 कॅप्शनमध्ये लिहिली आहे. आज म्हणजेच 1 डिसेंबर रोजी समांथाने लग्न केलं आहे.
advertisement
4/7
अभिनेत्री समांथाला दुसऱ्यांदा नवरी बनलेलं पाहून तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. समांथानं अत्यंत साधेपणाने तामिळनाडूच्या कोइंब्तूर येथील ईशा योग केंद्र येथे लग्न केलं.
advertisement
5/7
समांथाने लग्नासाठी लाल रंगाची सुंदर साडी नेसली होती. हातावर साजेशी मेहंदी, केसांचा बन आमि त्यात गजरा माळला होता. तर राजने व्हाइट कलरचा कुर्ता पायजमा आणि क्रिम कलरचं जॅकेट वेअर केलं होतं.
advertisement
6/7
समांथा आणि राज यांच्या अफेअरची अनेक दिवसांपासून चर्चा रंगली होती. दोघेही एकमेकांना डेट करत होते. पण त्यांची कधीच त्यांच्या अफेअरवर भाष्य केलेलं नव्हतं. अखेर लग्नाचे फोटो शेअर करत त्यांनी त्यांचं नात जगजाहिर केलं आहे.
advertisement
7/7
समांथा आणि राज यांच्या लग्नाला फक्त 30 लोक उपस्थित होते. हे 30 लोक त्यांच्या अत्यंत जवळचे नातेवाईक आणि मित्र मंडळींपैकी होते. लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी समांथाला लग्नाच्या आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Samantha Prabhu Marriage : लाल साडी अन् हातावर मेहंदी, समांथा प्रभूने गुपचूप केलं दुसरं लग्न; फोटो आले समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल