Sleeping Habits : थंडीत ब्लँकेटने तोंड झाकून झोपणं पडेल महाग! तज्ज्ञांनी सांगितलेले परिणाम वाचून हैराण व्हाल!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Side effects of covering face while sleeping : हिवाळ्यात थंडीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी बरेच लोक ब्लँकेट संपूर्ण अंगावर घेऊन झोपतात. अगदी तोंडही झाकून झोपतात. पण असं नखं-शिखांत अंगावर पांघरून घेऊन झोपणं आपल्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतं. म्हणून तुम्हाला अशी सवय असेल तर सावध राहा आणि या सवयीचे काय काय दुष्परिणाम होऊ शकतात ते एकदा वाचाच.. ही सवय शरीरात अनेक समस्यांना आमंत्रण देते.
advertisement
1/7

एनडीटीव्हीच्या बातमीमध्ये एका संशोधनाच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, तोंड झाकून झोपण्याची सवय शरीरासाठी हानिकारक ठरू शकते, विशेषतः जर ती दीर्घकाळापासून असेल तर.. ही अशी सवय आहे, ज्यापासून दूर राहणे अधिक चांगले. चला पाहुयात या सवयीचे काय काय दुष्परिणाम होऊ शकतात.
advertisement
2/7
जेव्हा आपण संपूर्ण चेहरा आणि डोकं ब्लँकेटने झाकून झोपतो, तेव्हा शरीराला पुरेशी ताजी हवा मिळत नाही. आपण श्वास सोडताना बाहेर जाणारा कार्बन डायऑक्साइड ब्लँकेटमध्येच अडकतो. आपण त्याच हवेत पुन्हा-पुन्हा श्वास घेत राहतो. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजन कमी होतो आणि कार्बन डायऑक्साइड वाढतो. यामुळे व्यक्तीला घुसमट जाणवते, झोप मोडते आणि सकाळी उठताना थकवा जाणवतो.
advertisement
3/7
तोंड झाकून झोपल्यावर ब्लँकेटमधील तापमान वाढू लागते. शरीराला झोपेसाठी हलके थंड वातावरण आवश्यक असते. तापमान वाढल्यामुळे जास्त उकडायला लागते, घाम येतो आणि बेचैनी निर्माण होते. यामुळे झोपही नीट होत नाही.
advertisement
4/7
कमकुवत ऑक्सिजन, जास्त कार्बन डायऑक्साइड आणि वाढलेले तापमान.. या तिन्ही गोष्टींमुळे गाढ झोपेवर परिणाम होतो. चांगली झोप मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप महत्वाची असते. झोप सतत बिघडत राहिल्यास चिडचिड, लक्ष कमी होणे आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
advertisement
5/7
असे झोपल्याने मेंदूचे नुकसान होऊ शकते. अशा लोकांना डिमेंशियासारखे जटिल आजार होण्याचा धोका वाढतो. या आजारामुळे हळूहळू स्मरणशक्ती कमी होते. त्यामुळे घरात कोणी तोंड झाकून झोपत असेल तर ही सवय हळूहळू कमी करणे गरजेचे आहे.
advertisement
6/7
तोंड झाकून झोपण्याची सवय असेल, तर ती एकदम न सोडता हळूहळू कमी करा. सुरुवातीला चेहरा अर्धा झाकून झोपा. काही दिवसात शरीराला बदलाची सवय होईल आणि नंतर तुम्ही सहजपणे तोंड न झाकता झोपू शकाल.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Sleeping Habits : थंडीत ब्लँकेटने तोंड झाकून झोपणं पडेल महाग! तज्ज्ञांनी सांगितलेले परिणाम वाचून हैराण व्हाल!