'रोहित-विराट गंभीरचा चेहराही बघायला तयार नाहीत', टीम इंडियात पडले दोन गट, ड्रेसिंग रूमच्या वादाची Inside Story
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीममध्ये कमबॅक झालं, पण या दोघांचं कोच गौतम गंभीरसोबतचं नात बिघडल्याचं वृत्त समोर आलं आहे.
advertisement
1/8

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज 2-0 ने गमावल्यानंतर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर आहेत, तसंच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची भारतीय क्रिकेट चाहत्यांमधली क्रेझ आणखी वाढली आहे.
advertisement
2/8
विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या वनडे क्रिकेटमधल्या भविष्याबाबत अजूनही सस्पेन्स आहे. तसंच त्यांच्या कोच गौतम गंभीरसोबतच्या नात्याबाबत होत असलेल्या चर्चांमुळे बीसीसीआयदेखील अडचणीत येत आहे. त्यातच आता रोहित, विराट आणि गौतम गंभीर यांच्यातले संबंध फारसे चांगले राहिले नसल्याचं वृत्त समोर आलं आहे.
advertisement
3/8
दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार विराट आणि रोहितचे गौतम गंभीरसोबत पूर्वीसारखे संबंध राहिले नाहीत, जसे तो पहिल्यांदा टीम इंडियाचा प्रशिक्षक झाला होता तेव्हा होते. रोहित आणि विराट यांचे गंभीरसोबतचे संबंध खराब होत चालल्याचा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे.
advertisement
4/8
'गौतम गंभीर आणि विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यातील संबंध तितके चांगले राहिले नाहीत, जितके ते असायला हवे होते. दोन्ही खेळाडूंच्या भविष्याबाबत रायपूर किंवा विशाखापट्टणममधल्या वनडेनंतर बैठक होऊ शकते', असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त आहे.
advertisement
5/8
कोहली आणि रोहित यांनी टेस्ट क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतली, त्यानंतर दोघांचेही गंभीरसोबतचे संबंध खराब व्हायला सुरूवात झाली, असा स्फोटक दावाही या वृत्तात करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियामधल्या वनडे सीरिजवेळी रोहित शर्मा आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्यातले संबंध चांगले नव्हते.
advertisement
6/8
टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर कोहली आणि रोहितने ऑस्ट्रेलियामधल्या वनडे सीरिजमधून टीम इंडियात बऱ्याच काळानंतर कमबॅक केलं. सुरूवातीच्या 2 सामन्यांमध्ये विराट शून्यवर आऊट झाला, यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याने अर्धशतक केलं. तर रोहितने एक शतक आणि एक अर्धशतक ठोकलं.
advertisement
7/8
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजला सुरूवात होताच कोहली आणि गंभीर यांच्यातील संबंधही चर्चेचा विषय बनले आहेत. सध्याची परिस्थिती आदर्श नाही, असं बीसीसीआयला वाटत आहे. गौतम गंभीरवर सोशल मीडियावर होत असलेल्या टीकेवरूनही बीसीसीआय अस्वस्थ आहे.
advertisement
8/8
'ऑस्ट्रेलिया सीरिजवेळी रोहित आणि आगरकर यांच्यात संवाद झाला नाही. तसंच कोहली आणि गंभीरही एकमेकांशी फारसे बोललेले नाहीत. रोहित आणि कोहलीचे चाहते सोशल मीडियावरून गंभीरवर हल्ला करत आहेत, त्यामुळे बीसीसीआय अस्वस्थ आहे', असं बीसीसीआयमधल्या सूत्रांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
'रोहित-विराट गंभीरचा चेहराही बघायला तयार नाहीत', टीम इंडियात पडले दोन गट, ड्रेसिंग रूमच्या वादाची Inside Story